आम्हाला पुन्हा पक्षात घ्या ! निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध

मुंबई-प्रतिनिधीः लोकसभा, विधानसभा(political updates) निवडणूक संपल्यानंतर आता महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. सत्ताधारी पक्षांबरोबर राहिल्यास निवडणुकीत फायदा होत असते. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे.

शिंदेंनी निवडणुकीनंतरही(political updates) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला भगदाड पाडले आहे. तर भाजप, राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडातील पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. आता महाविकास आघाडीत भवितव्य नाही, असे सांगून स्थानिक पदाधिकारी पक्ष सोडत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून ते भाजपला पसंती देत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडलेले काही महत्त्वाचे नेते परत येण्याची चिन्हे दिसत आहेत. तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांना आता भाजपमध्ये पुनरागमना विषय चलबिचल सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या नेतृत्वापुढे मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकणातील एका प्रमुख नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतले असल्याचे समजते. तसेच, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजयकाका पाटील यांनी देखील भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने त्यांच्या परतण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

त्यासोबत समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने आणि राजन तेली यांसारख्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पुढील पाच वर्ष सरकार भक्कमपणे चालणार आहे, सरकारला बहुमत असल्यामुळे 5 वर्ष भीती नाही, मग सत्तेसोबत राहून राजकीय हित जोपसता येत.

सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याने हे नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने अशा नेत्यांशी थेट संपर्क साधल्याची किंवा त्यांना पक्षात सामील करून घेण्याच्या बाबतीत काही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी दोन्ही बाजूनी वेट अँड वॉचची भूमिका दिसत आहे.

राजकीय पक्ष सोडून परत येणाऱ्या नेत्यांचा निर्णय हा पक्षाच्या फायद्याचा आणि त्यांच्या निष्ठेवर आधारित असतो. त्यामुळे या नेत्यांना पक्षात परत घ्यायचे की नाही, यावर भविष्यात चर्चा होईल आणि याबाबतचा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवर होईल असे देखील भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. अशा प्रकारच्या नेत्यांच्या इनकमिंगमुळे भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. भाजप पक्ष नेतृत्व याविषयी निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

शेवटच्या तारखेपूर्वीच जीएसटी वेबसाइट बंद

Mirae Asset Small Cap Fund गुंतवणुकीसाठी खुला, ‘या’ तारखेला होणार सब्स्क्रिप्शन बंद

मविआत एकत्र येण्यासारखं काही नव्हतं, कॉंग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र होते; मुनगंटीवारांची टीका