कौशल्याने सक्षम ‘लखपती दीदी’

महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याबरोबरच त्यांच्यात उद्योजकता, (entrepreneur)कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी एक सक्षम पाऊल म्हणून ‘लखपती दीदी’ योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३मध्ये आपल्या भाषणात ‘लखपती दीदी योजने’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाते. यात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनविणे, ड्रोन चालविणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येते.(entrepreneur)

ही योजना राज्यातील स्वयंसहायता गटामार्फत चालविली जाते. प्रत्येक भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते; पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटात सहभागी व्हावे लागणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे ‘लखपती दीदी’ योजना राबविण्यात येते. ही योजना स्वयंसहायता गटातील महिलेला लागू आहे. बचत गटाच्या सदस्य असणाऱ्या आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेच्या लाभासाठी हे उत्पन्न किमान चार कृषी हंगाम किंवा व्यवसायाच्या अनुषंगाने मोजले जाते. सरासरी मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते शाश्वत धरण्यात येईल. या योजनेअंतर्गत बचत गटांच्या सदस्य असणाऱ्या महिलांना आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास आणि उपजीविकेसाठी ‘सहायक’ म्हणून ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
योजनेतून केवळ सामाजिक आणि आर्थिक समावेशापलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बचत गटाच्या सदस्य असणाऱ्या महिलांना उद्योजकीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि असे उपक्रम राबविण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :

सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे संजय मंडलिकांचा हल्लाबोल

राहुल गांधी यांची प्रचार सभा, व्यासपीठावर भाजप उमेदवाराचा फोटो

2000 कोटी रुपयांमध्ये बनवले जाणारे हे दोन साऊथ चित्रपट