मला आठवतंय, माझ्या पहिल्या बाळाच्या जन्माची चाहूल लागली तेव्हा मी झी टीव्हीवर ‘कोई(series) अपना सा’ या मालिकेमध्ये काम करत होते. मी सध्या झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेत नीलमची भूमिका साकारत आहे. मला आठवतंय, माझ्या पहिल्या बाळाच्या जन्माची चाहूल लागली तेव्हा मी झी टीव्हीवर ‘कोई (series)अपना सा’ या मालिकेमध्ये काम करत होते. त्यावेळचा माझा प्रवास खरंच छान होता. माझ्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये मी काम करत होते.
त्यानंतर मात्र मी तीन ते चार वर्षांचा ब्रेक घेतला; कारण मला माझ्या मुलीसोबत जमेल तेवढा वेळ घालवायचा होता आणि तिची काळजी घ्यायची होती. त्यामुळे त्यावेळेस तडजोडी अशा काही केल्या नव्हत्या; पण होय, आई बनण्याआधी मी माझ्यासाठी काही मर्यादा घालून घेतल्या होत्या. मी कामावर परतले, तेव्हा मी माझ्या कामाची वेळ कमी केली आणि उर्वरित वेळ माझ्या मुलीसाठी राखून ठेवला. महिन्याचे सगळे दिवस मी व्यग्र राहणार नाही आणि जमेल तेव्हा ब्रेक घेईन, याची मी खबरदारी घेतली.
आई झाल्यानंतर पहिल्या वर्षी मी काम करत नव्हते, त्यामुळे कामाच्या बाबतीत काहीच सांभाळायचं नव्हतं. मात्र, माझ्या खासगी आणि कौटुंबिक आयुष्यात भावनिक आणि खासगी पद्धतीनं अनेक बदल होत होते.
आई झाल्यानंतर माझ्या कुटुंबाला माझं प्राधान्य होतं. मला माझ्या मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता आणि याचाच अर्थ हा होता, की आता मी माझ्या करिअरवर माझं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. आधी मी अतिशय वर्कोहॉलिक होते, अगदी दररोज काम करायचे; पण मातृत्वामुळे माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला. मी थोडा वेळ बाजूला काढू लागले. माझ्या कामाच्या वेळेमध्ये घट केली आणि माझ्या प्रोजेक्ट्सच्या बाबतीत निवड करू लागले. सुदैवानं माझ्या टीमचं समर्थन मला लाभलं आणि देवाच्या कृपेनं सगळं नीट पार पडलं.
मातृत्वामुळे व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल होतात आणि ते त्यांना संपूर्णपणे बदलून टाकतात. हे केवळ तुमच्या करिअरवरच नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावरच परिणाम करतं. तुमचं मूल तुमच्यासाठी सर्वोत्तम प्राधान्य बनतं आणि मग तुम्हाला तुमची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांना बाजूला सारावं लागतं. सगळं काही तुमच्या मुलांच्या सभोवताली फिरत असतं आणि हा अनुभव बहुतेक आयांना येतो.
मी माझ्या करिअरसाठी निवडी करताना मी नेहमीच प्रथम माझ्या मुलांचा दिनक्रम आणि जीवनशैलीचा विचार करते आणि मगच मी माझा दिनक्रम ठरवते. त्यामुळे मी नवीन प्रोजेक्ट स्वीकारते, तेव्हा नेहमीच माझ्या मुलांना प्राधान्य देते आणि मगच नवीन जबाबदारी उचलते.
हेही वाचा :
सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे संजय मंडलिकांचा हल्लाबोल
कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान
13 एप्रिलपासून या 3 राशींना येणार अच्छे दिन होणार आर्थिक भरभराट