ठाकरे गटाच्या नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश ?; ‘शत प्रतिशत भाजपा’ चे स्वप्न पूर्ण?

मुंबई प्रतिनिधी : राज्यात लोकसभेच्या पराभवांनंतर महायुतीने विधानसभा(latest political news) निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली अनेक लोकहिताचे शासन निर्णय घेत लाडक्या बहिणी पासून लाडक्या शेतकरी वर्गा पर्यंत सर्वांना खुश करण्यात महायुती यशस्वी ठरली आणि विधानसभेत भरघोस मतांनी विजयी झालेल्या महायुतीने पुन्हा एकदा राज्यात आपले सरकार स्थापन केले.

या अविश्वसनीय विजयानंतर भाजपाकडून(latest political news) आता आगामी सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यासह देशभरात ‘शत प्रतीशत भाजपा’ हा संकल्प केल्याचे समजते. त्यानुसार राज्यातील आगामी निवडणुकांची तयारी देखील भाजपाने सूरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीत नाराज गटाला आपल्याकडे वळविण्यासाठी आता तयारी सुरु केल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आता भाजपाकडून शत प्रतीशत भाजपा राबविणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीत मोठी फूट पहायला मिळाली.

जिल्ह्यातील हाच नाराज गट भाजपाच्या गळाला लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ठाकरे सेनेतील काही नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते हे शिंदेंच्या तंबूत जात असतानाच आता या सर्वांना भाजपाने आपल्याकडे खेचल्याचे समजते.

अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्षाचा भूमिकेवर प्रचंड नाराज झाले असून विधानसभा निवडणुकीनंतर देखील पक्षातील वरिष्ठांकडून देखील कुठलीही दखल न घेतल्याने हा सर्व नाराज गट लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

काल गुरुवारी ठाकरे गटातील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेगटात पक्षप्रवेश केला. यानंतर लवकरच उर्वरित नेते आणि पदाधिकारी देखील शिंदेगटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी हे भाजपाच्या धोरणांना आत्मसात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नक्की भाजपात जातील की शिंदेंच्या शिवसेनेत हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा :

पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्र्यांचे वाटप स्पष्ट: सातारा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडे, सांगली-सोलापूरचे काय?

‘ये जवानी है दिवानी’ने 11 वर्षांनंतर पुन्हा उडवून दिली खळबळ, पहिल्याच दिवशी…

शिक्षकी पेशाला काळिमा ; अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला अन् बंद केला दरवाजा