देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. निवडणुकांमुळे (shoulder)अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलींचा धडाका सुरू आहे. इलेक्शनच्या काळात नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने फिरताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी फक्त खांद्यावर हात ठेवल्याच्या रागातून पक्षाच्या कार्यकर्त्याच्याच कानाखाली मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले(shoulder) जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार एका व्हायरल व्हिडिओमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. कर्नाटकातील हावेरी येथे धारवाडमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विनोदा आसुती यांच्या प्रचारासाठी निवडणूक रॅली काढण्यासाठी आले होते. या रॅलीदरम्यान त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यालाच कानाखाली मारल्याचा प्रकार घडला. ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी डी. के. शिवकुमार आले अन् ते गाडीतून उतरताच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला. याचवेळी एका हौशी कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवला. याचाच उपमुख्यमंत्र्यांना राग आला आणि त्यांनी तिथेच त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवरुन भाजपने डी. के शिवकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्या कार्यकर्त्याची काय चूक होती? काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षासाठी का काम करावे वाटते? या सर्वांना एका परिवाराने घेरले आहे, असा घणाघात अमित मालवीय यांनी केला आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस !
लोकसभा निवडणूक प्रचारात “व्यवस्थे”वरच संशय व्यक्त
कोल्हापुरातील ‘या’ दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य