कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून राज्यभर उडालेला प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी खाली बसणार आहे. प्रचाराच्या तोफा थंड पडणार आहेत. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवार प्रचाराच्या प्रचंड गदारोळाचा ठरला. राज्यभर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी, रविवारी अनेक महानगरामध्ये प्रचंड गर्दीच्या प्रचार सभा घेतल्या. या नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे केलेले नियोजन सामान्य जनतेसाठी(political articles) कमालीचे त्रासदायक ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, याशिवाय राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यांच्या जाहीर सभांनी महाराष्ट्रात प्रचाराचा(political articles) धुरळा उडाला.
प्रचार बंद होण्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, यांची जाहीर सभा कोल्हापुरात झाली तर शनिवारी प्रियांका गांधी यांची जाहीर सभा झाली. या मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांसाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले होते. बंदोबस्ताचे नियोजन सामान्य जनतेसाठी मात्र अतिशय त्रासदायक ठरले. व्हीआयपी नेते सभेच्या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी आधी तासभर महत्त्वाचे रस्ते पोलिसांनी रहदारीसाठी बंद करून ठेवले होते.
सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी च्या सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबणार असल्याने रविवारी अनेक राजकीय पक्षांनी मोठ्या सभांचे नियोजन अनेक ठिकाणी केले होते. सोमवारी उमेदवारांनी रॅलीज काढल्या होत्या. पदयात्रा काढल्या होत्या.
प्रचार संपला आणि उमेदवारांच टेन्शन मात्र वाढलं. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत कसे आणता येईल? मतदानाची टक्केवारी किती होईल? मतदान कमी झालं तर ते कोणाच्या फायद्याचं आणि मतदान जास्त झालं तर ते कोणाच्या तोट्याचे याचे हिशोब आत्तापासून सुरू झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने मात्र मतदानाची जय्यत तयारी केली आहे आणि मतदान टक्केवारी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रशासनाने शक्यतो प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येकाने राष्ट्र कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन प्रिंट मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियाने तसेच सोशल मीडियाने केले आहे. त्याचा परिणाम कसा होतो हे मतदानाच्या सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत कळणार आहे.
चार-पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत(political articles) सत्ताधाऱ्यांच्याकडून या देशाचे संविधान धोक्यात आहे हा विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून करण्यात आलेला प्रचार अतिशय प्रभावी ठरला आणि त्याचा भारतीय जनता पक्षाच्या संख्याबळावर प्रतिकूल परिणाम झाला होता. याशिवाय देशातील अल्पसंख्य समाजाने मोदी विरोधी मतदान केले होते. त्याचा फायदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला झाला होता. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र कोणताही एक मुद्दा पुढे आणला गेला नव्हता.
महायूती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळविण्यात आले, सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राची पिछेहाट झाली. महाराष्ट्र हा गौतम अदानीला विकण्यात आला, या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला तर महाविकास आघाडी सरकार असताना हा महाराष्ट्र कसा मागे गेला हे महायुतीच्या नेत्यांकडून आकडेवारीनिशी जाहीर प्रचार सभातून सांगण्यात आले. याशिवाय दोन्ही आघाड्यांनी प्रचारासाठी डिजिटल तंत्राचा तसेच दूरदर्शन माध्यमांचा पुरेपूर वापर केला. प्रचारात लाडक्या बहिणीला दोन्ही बाजूने प्राधान्य देण्यात आले होते.
ह्या निवडणुकीच आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल आणि ते म्हणजे तिसरी आघाडी रिंगणात आली आहे.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा बऱ्याच मंडळींनी तिसऱ्या आघाडीचा आश्रय घेतला आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या कुटुंबातील राजकीय गृहकलह मोठ्या प्रमाणावर पुढे आलेला दिसला. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या निवडणूक राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पवार यांनी युगेंद्र पवार यांचा प्रचार केला आहे. त्यांनी प्रथमच अजितदादा पवार यांच्या विरोधात प्रचार केला आहे.
हेही वाचा :
‘हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी’
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे…, Video