अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन

अ‍ॅपल कंपनीने आपल्या आयफोन यूजर्सना(customer value proposition) एक मोठं गिफ्ट दिलं आहे. यामुळे खराब झालेले आयफोन दुरुस्त करण्यासाठी आता कमी खर्च करावा लागणार आहे. कारण आता आयफोनमध्ये अ‍ॅपलचे जुने ओरिजिनल पार्ट्स देखील बसवता येणार आहेत.

आयफोन यूजर्सना(customer value proposition) माहिती असेल, की यापूर्वी आयफोनमधील एखादा पार्ट खराब झाल्यास त्याठिकाणी केवळ नवीन ओरिजिनल पार्टच बसवता येत होता. दुसऱ्या कंपनीचा किंवा अ‍ॅपलचाच जुना पार्ट बसवल्यानंतर फेस आयडी, टच आयडी असे बरेचसे फीचर्स बंद होत होते. मात्र आता असं होणार नाही. आयफोनमध्ये अ‍ॅपलचे ओरिजनल पण जुने पार्ट्स देखील बसवता येणार आहेत.

आतापर्यंत अ‍ॅपल कंपनीचा रिपेअरिंगबाबत एक मोठा नियम होता. आयफोनचा सीरियल क्रमांक आणि बदलण्यात आलेल्या नवीन पार्टचा सीरियल क्रमांक मॅच होणं गरजेचं होतं. यामुळे आधी वापरण्यात आलेले जुने पार्ट्स वापरणं अशक्य होतं. आता हा नियम बदलण्यात आला असून, रिपेअर केल्यानंतर बसवलेल्या पार्ट्सचा सीरियल नंबर कॅलिब्रेट करण्यात येईल. त्यामुळे फोन नीट काम करेल.

सध्या ही सुविधा केवळ iPhone 15 सीरीजला लागू करण्यात आली आहे. येत्या काळात इतर मॉडेल्सना देखील ही सुविधा लागू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे यूजर्सचा भरपूर फायदा होणार आहे.

हेही वाचा :

मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही; शरद पवार यांचं PM मोदींवर टीकास्र

हातकणंगलेसाठी मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, सोमवारी गांधी मैदानात देणार बूस्टर डोस

सांगलीत नवा ट्वीस्ट! विशाल पाटील काँग्रेसच्या वतीनेच उमेदवारी अर्ज भरणार; ठाकरेंचं टेन्शन वाढणार?