महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेचा तिढा दिवसेंदिवस(nomination) वाढत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून विशाल पाटील हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आता ते मंगळवारी काँग्रेसच्याच तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्याची अधिकृत घोषणा(nomination) महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. मात्र तरीही विशाल पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पक्षाने आपल्या उमेदवारीबाबत पुनर्रविचार करावा, अशी मागणी विशाल पाटील करत आहेत. अशातच आता ते मंगळवारी काँग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची विशाल पाटील यांना अजूनही आशा आहे. त्यामुळेच ते मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जर काँग्रेस चिन्हावरच्या उमेदवारीचा निर्णय झालाच नाही तर पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज नाकारल्यानंतर विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी अर्ज दाखल करताना विशाल पाटील यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. ते गणपती मंदिर ते काँग्रेस भवनापर्यंत भव्य रॅली काढून अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
आचारसंहितेच्या नावानं चांगभलं!
मोदी की गॅरंटी! जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?
६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा