तापानं फळभाज्या आणि पालेभाज्या फणफणल्या

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे दैनंदिन बाजारात भाजीपाल्याची आवक (vegetables)घटली असल्याने दर वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी देखील घटल्याचे चित्र आहे कडक ऊन असल्याने सरबत आणि रसवंतीगृह गजबजू लागली आहेत. गृहिणींकडूनही लिंबांची खरेदी देखील वाढली आहे.

आवकच्या तुलनेत लिंबांना मागणी वाढल्याने आठवडाभरात लिंबाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही चढ्या भावाने लिंबाची विक्री होत आहे. (vegetables)दर्जानुसार लिंबाच्या नगाची विक्री ३ ते ७ रुपये भावाने होत आहे.मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ८०० ते १००० गोणी लिंबांची आवक होत आहे.

फुलकोबी 20-30 रुपये नग,कोथिंबीर: 20 रुपये जुडी, हिरवी मिरची 80 रुपये किलो,ढेमसे 80 रुपये किलो,कारले 40 रुपये किलो,वांगी 40 रुपये किलो,बटाटे 30 रुपये किलो,चवळी शेंगा 40 रुपये किलो,पत्ताकोबी 40 रुपये किलो,फणस 40 रुपये किलो,भेंडी 40 रुपये किलो, शिमला मिरची 80 रुपये (vegetables)किलो,टोमॅटो 40 रुपये किलो
यंदा लसूण, फ्लावर, कोबी व शेवग्याच्या दरात किंचित घट झाली आहे. मात्र, हिरव्या मिरच्या आणि लिंबाची आवक घटल्याने त्यांचे दर वाढले आहेत.

भाव आणखी वाढण्याची शक्यता
आवक मंदावल्याने आगामी काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन हंगामाचा माल बाजारात येईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहू शकते.

हेही वाचा :

‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत

‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग

खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या