‘न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवतेय’; रोहित पवारांची सरकारवर तीव्र टीका

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेले तरीही एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मोक्काचा गुन्हा दाखल केला. कराडवर कारवाई व्हावी यासाठी विरोधक आंदोलन करत आहे. आज धनंजय देशमुख यांनीही तीव्र आंदोलन केलं. या सर्व घडामोडीनंतर आता आमदार (Rohit Pawar)रोहित पवार यांनी भाष्य केलं.

सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोननाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? असा सवाल(Rohit Pawar) रोहित पवार यांनी केला.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि तपास यंत्रणांबद्दल अविश्वास व्यक्त करत त्यांनी हे आंदोलन केलं.

चार तासांनंतर त्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी त्यांच्या या आंदोलनामुळं आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं.

पुढं ते म्हणाले की, राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही. शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या, असं रोहित पवार म्हणाले.

तर सुषमा अंधारेंनी यांनी लिहिलं की, उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोगमध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा, असं आवाहन अंधारेंनी केलं.

हेही वाचा :

केक शॉपमधील अल्पवयीन कामगारांमध्ये वाद; एकमेकांवर चक्क कटरने वार

विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती?

‘ब्राह्मणाने 4 मुलांना जन्म दिल्यास लाखांचे बक्षीस’; राज्यमंत्र्यांच्या घोषणेचे कारण काय?