मराठी सिनेरसिकांसाठी चित्रपट हा खूपच(cinema) आवडता विषय असतो. नवनवीन चांगला कंटेट असलेला आणि चांगल्या धाटणीचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. अशामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्दर्शक नवनवीन चित्रपटांची घोषणा देखील करत असतात. अशामध्ये एप्रिल महिना मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरणार आहे.
या महिन्यामध्ये ३ जबरदस्त चित्रपट(cinema) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये महेश मांजरेकर यांचा ‘जुना फर्निचर’, सोनाली खरेचा ‘मायलेक’ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे तिन्ही चित्रपट कधी रिलीज होणार आहेत हे आपण पाहणार आहोत…
मायलेक –
आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया आनंद मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाइफ आई-मुलगी आपल्याला एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.
संघर्षयोद्धा –
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला रिलीज होणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे.
जुना फर्निचर –
मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, प्रोमोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ते चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
हेही वाचा :
ठग्स ऑफ पॉलिटिशियन इन महाराष्ट्र
सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष
ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात