हंगामातील सर्वात खतरनाक बॉल…. 35 वर्षाच्या इशांत शर्मानं

कोलकता नाईट रायडर्सची आयपीएलच्या(IPL) यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका बुधवारीही कायम राहिली.

कोलकता नाईट रायडर्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयाची मालिका बुधवारीही कायम राहिली. सुनील नारायण (८५ धावा, १/२९) व आंद्रे रसेल (४१ धावा व १/१४) (IPL)यांची अष्टपैलू चमक आणि मिचेल स्टार्क (२/२५), वैभव अरोरा (३/२७), वरुण चक्रवर्ती (३/३३) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकता संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर १०६ धावांनी दणदणीत विजय साकारला.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी 18 षटकार आणि 22 चौकार मारले. पण याच सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलच्या हंगामातील सर्वात खतरनाक बॉल टाकला. इशांत शर्माने 3 षटकात 43 धावा दिल्या मात्र त्याच्या एका चेंडूने खळबळ उडवून दिली. त्याने 20 व्या षटकात हा चेंडू टाकला.

या सामन्यात रसेल खूपच आक्रमक दिसला. त्याने 18 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या होत्या पण त्यानंतर इशांतने एक चेंडू टाकला ज्याचे त्याच्याकडे उत्तर नव्हते. इशांत शर्माने रसेलला उत्कृष्ट यॉर्कर टाकले. चेंडू खेळताना रसेलही खेळपट्टीवर पडला. रसेलला इशांतचा हा बॉल इतका आवडला की, बोल्ड झाल्यानंतर त्याने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

या चेंडूशिवाय या सामन्यात इशांत शर्मा काही विशेष करू शकला नाही. त्याच्या दुसऱ्याच षटकात इशांत शर्माने 26 धावा दिल्या आणि डावखुरा फलंदाज सुनील नरेनने त्याला मारले. नरेनने त्या षटकात 3 षटकार आणि 2 चौकार लगावले.

हेही वाचा :

राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा

पंतच्या एका चुकीमुळे दिल्लीचा मानहानीकारक पराभव….

नीलेश लंकेंना आव्हान; अजितदादांनी काय त्रास दिला ते सांगा