महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही

महाराष्ट्रातील मोठे उद्योग(industry), गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यातबंदी उठवताना महाराष्ट्रातला शेतकरी नाही तर फक्त गुजरात आठवला.

पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का? महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.(industry)

भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपला फक्त मतांसाठी हवे आहेत, निवडणुका आल्या की छत्रपतींचे नाव घेता व नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपची नीती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षांत सोलापुरात पाचवेळा आले, पण 5 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत. शहराला सात दिवसांतून एकदा पाणी येते, हर घर नल, नल में जल ही मोदी यांची योजना सोलापुरात फेल गेली आहे. सोलापुरात नल है पर नल में जल नही, अशी परिस्थिती आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा :

कोल्हापूरचा दत्तक प्रकरण त्यावर अकारण राजकारण!

“विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय”; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले…

टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी