कोल्हापूर : पायलटची डुटी संपली, कंपनीने विमानच रद्द केले; प्रवाशांचे हालच हाल

पायलटच्या ड्युटीची वेळ संपल्याने आणि दुसरा पायलटही उपलब्ध नसल्याने कंपनीने(plane) मुंबई कोल्हापूर- बंगळुरू हे विमानच रद्द केल्याचा प्रकार सोमवारी कोल्हापुर विमानतळावर घडला. कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई– बेंगलोर हे विमान प्रथम कोल्हापूरला(plane) येते आणि पुढे पाच वाजता बंगळुरूकडे रवाना होते. मात्र, मुंबईत सोमवारी झालेल्या वादळामुळे या विमानाला कोल्हापुरात येण्यास तासभर उशिर झाला. यामुळे संबंधित विमानाच्या पायलटची ड्युटी संपल्याने त्याला हे विमान पुढे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. हे विमान पुढे घेऊन जाण्यास संबंधित विमान कंपनीकडे पायलट नसल्याने हे विमान अचानक रद्द करण्यात आले.

कोल्हापूर विमानतळावरून सायंकाळी ४:५५ वाजता हे विमान बंगळुरूकडे जाणार होते. यामध्ये ५० च्या आसपास प्रवासी होते. हे प्रवासी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विमानतळावर आले होते. मात्रअचानक विमानच रद्द केल्याने प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी सकाळी हे विमान दुसऱ्या पायलटच्या मदतीने बंगळुरूला पोहोचवण्यात आले.

दरम्यान, चालकाची ड्युटीची वेळ संपल्याने थेट विमानच रद्द होण्याची पहिलीच वेळ असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच संबंधित विमान कंपनीने नियमावर बोट ठेवून ही कृती केली असली तरी प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा :

मोठी अपडेट; सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांना लवकरच UPI मार्फत

लाचारीलाही मर्यादा असते,’ जिरेटोप वादावरुन शरद पवार संतापले

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा