कोल्हापूर : 100 कोटीच्या रस्त्यांचं राजकारण तापलं, प्रकरण पालकमंत्र्यांवर शेकलं

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्यानंतर त्यावरून टीकेची झोड लोक प्रतिनिधींवर (guardian)उठली होती. सर्वसामान्यांनी केलेला आक्रोश पाहून लोकप्रतिनिधींनी महाविकास आघाडी आणि माहितीच्या काळात कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर केल्याचा दावा करत आहेत. सध्या या कामाला सुरुवात झाली. 30 मे रोजी त्याची अंतिम मुदत आहे.

मात्र, अजून देखील काही ठिकाणी रस्त्यांच्या कामांना(guardian) सुरुवात झालेली नाही. त्यावरून कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांवरून राजकारण तापला आहे. तापलेलं राजकारण आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर शेकलं जात आहे. कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून जाब विचारला गेला आहे.

शंभर कोटी रस्त्यांची काम अजून अपूर्ण असल्याबद्दल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने अधिकाऱ्यांच्या समवेत ठेकेदार कंपनीला जाब विचारला. शंभर कोटी रस्त्यातील दोन-दोन किलोमीटरचे सबकॉन्ट्रॅक्ट द्यावीत म्हणून पालकमंत्र्यांचे बगलबच्चे दबाव टाकत आहेत का? असा सवाल नागरिक कृती समितीने करत धारेवर धरले. जनतेच्या हिताची काम कोणी बंद पाडत असतील तर त्याचे नाव जाहीर करा आमचा आम्ही बघून घेतो अशा शब्दात इशारा दिला आहे.

यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने 13 रस्ते कामासाठी दिले असल्याचे सांगितले. त्यावर कृती समितीने तुम्हाला कोणी ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले महापालिकेचे ठेकेदार, पालकमंत्र्यांचे बगलबच्चे टक्केवारीसाठी त्रास देत आहेत. सबकॉन्ट्रॅक्टर नेमण्यासाठी दबाव आणतात काय? असे असेल तर सांगा. अशा शब्दात कृती समितीने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना झापले. 31 मेपर्यंत पाच रस्ते पूर्ण करावेत अन्यथा हिसका दाखवू, असा इशारा कृती समितीने दिल्यानंतर 31 मे पर्यंत पाच रस्ते पूर्ण करू असे आश्वासन ठेकेदाराने दिले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक घेऊन अभ्यास दौऱ्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे स्पेन दौऱ्यावर आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता जर ठेकेदार वेळेत कामे पूर्ण करत नसेल कामात टाळाटाळ करत असेल तर त्यांना ब्लॅक लिस्ट करावं अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पेन वरून दिले आहेत.

हेही वाचा :

अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात

निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात…

ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, 5 शिवसैनिकांना अटक

कोल्हापुरातील भीषण दुर्घटना; भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले