इंग्रजी नववर्ष सुरु होताच येणारा पहिला सण म्हणजेच मकरसंक्रात. यंदाची मकरसंक्रात अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे(Sesame). हळदीकुंकवाचे वाण तसेच पतंग घेण्यासाठी ग्राहकांची बाजारात मोठी रेलचेल असल्याचे दिसून येत आहे.
मात्र अशातच मकरसंक्रातीत महत्त्वाचे असणाऱ्या तिळाच्या(Sesame) लाडूचा गोडवा कमी होणार आहे. मकरसंक्रातीत तिळाची मोठी मागणी पाहता अचानक तिळाच्या किमतीत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या तोंडावर दीडशे रुपये किलो मिळणाऱ्या तिळाच्या भावात अचानक ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता संक्रांतीत किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने विकला जात आहे.
दरम्यान, सातत्याने जीवनावश्यक वस्तू महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. त्यातच आता मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वाढल्याने सणाचा गोडवा कमी झाला आहे.
हेही वाचा :
भारताला अजून एक मोठा धक्का, बुमराहसह अजून एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर
ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो; धनुभाऊंचा फोटो दाखवत धसांचा नवा गौप्यस्फोट
प्रभासच्या लग्नाचे गुढ: ‘बाहुबली’चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?