कोल्हापूर शहरालगत कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रिंग कामगारावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, शिवशंभो चौक, मूळ रा. इंदिरानगर यांचा मृत्यू झाला. अनैतिक(Immoral) संबंधातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. घटनास्थळावरून कोयता आणि चाकू जप्त करण्यात आला. कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली दौऱ्यावर असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार असून, तो पूर्वी इंदिरानगर परिसरात राहत होता. काही दिवसांपासून त्याचे शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो त्या महिलेच्या घरीच राहत होता.
त्याच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता. आज सकाळी दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे कामासाठी बाहेर पडले. दुपारी बाराच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने दत्ताकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यासाठी दत्ता आणि त्याचा मित्र दुचाकीवरून (एमएच ०९ बीक्यू ४९८५) सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले. त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले

अनैतिक (Immoral)संबंधाचा राग मनात धरून त्याने दत्ताचा काटा काढण्याचा कट रचला. दत्ता तिथे येताच संशयित मुलाने त्याच्या छातीवर दगड मारला, त्यामुळे दत्ता खाली पडला. त्यानंतर त्याने हातातील कोयत्याने सपासप वार केले. वार इतके वर्मी होते की, दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर दत्ताचा मित्र ठोंबरे तेथून पळून गेला. अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपाधीक्षक विमला एम. शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले.
तासाभरात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक महादेव पोवार , अंमलदार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे यांचा पथकात समावेश होता. परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अहवालात तोंडावर चार वर्मी वार झाल्याने दत्ताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मिळालेल्या हत्यारांनी खून झाला नसून, खुनात वापरलेला कोयता नंतर जप्त करण्यात आला.
हेही वाचा :
पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा!
शिखर धवन पडला पुन्हा प्रेमात?, मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल
वयानुसार किती झोप आवश्यक? समजून घ्या झोपेचं गणित, अन्यथा..