मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीबरोबर एक भीषण (accident)दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडून आली.

यात दुर्घटनेत (accident)शेकडो प्रवासी समुद्राच्या खोल गाभाऱ्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यात नौदलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान या दुर्घटनेचा एक थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. यात प्रवाशांनी खाचखच भरलेली बोट खोल समुद्रात विलीन होताना म्हणजेच बुडताना दिसून येत आहे.
या शेअर केलेल्या पोस्टमध्ये, या व्हिडिओतील दृश्ये ही मुंबईतील बोट दुर्घटनेची असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र विश्वास न्यूजने जेव्हा या व्हिडिओची पडताळणी केली तेव्हा याबाबत एक वेगळाच खुलासा करण्यात आला आहे. नक्की काय आहे प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊयात.
तर 19 डिसेंबर 2024 रोजी @mumbai.hai.hai नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करताच फार वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये, ‘अलिबागहून गेट वे ऑफ इंडियाला येताना बोट उलटली’ असे लिहिण्यात आले आहे.
या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी व्हिडीओचे कीफ्रेम गूगल लेन्सवर सर्च करण्यात आले. या तपासात हा व्हिडिओ खरंतर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी न्यूज एजन्सी असोसिएट प्रेसच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आल्याचे दिसून आले. यात असे लिहिले होते की, ‘काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकमधील किवू तलावामध्ये शेकडो लोकांनी भरलेली बोट उलटून किमान 78 जणांचा मृत्यू झाल्याचे लाईव्ह फुटेज एका प्रत्यक्षदर्शीने चित्रित केले’.
याचप्रमाणे या शोधात आणखीन एका जागी हा व्हिडिओ अपलोड केल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आफ्रिका या युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला होता.
याजागीही हा व्हिडिओ काँगोच्या दुर्घटनेचा असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच काय तर, यांनतर मुंबई बोट दुर्घटनेचे व्हिडिओ देखील तपासण्यात आले जे या व्हायरल व्हिडिओपेक्षा फार वेगळे आहेत.
अधिक माहितीसाठी मिड डेचे वरिष्ठ रिपोर्टर समिउल्ला खान यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ज्यात त्यांनी खुलासा करत सांगितले की, हा व्हायरल व्हिडीओ मुंबई बोट दुर्घटनेच्या घटनास्थळाचा नाही. त्यांनी हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा दावा केला जो यापूर्वीही एकदा व्हायरल करण्यात आला होता.
त्यांच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आले. यातून हेच निष्कर्ष समोर येत आहेत की, हा काँगोमधील बोट दुर्घटनेचा व्हिडीओ असून यात ह्या व्हिडिओ मुंबईतील बोट दुर्घटनेचा असल्याचा खोटा आणि फसवा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा :
भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग; ठाकरे गटाचे माजी नगरसेवक कारणीभूत?
“मुस्लिम घरात जन्म, पण ब्राह्मण संस्कार; हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा अपूर्ण राहिलेल्या अभिनेत्याची कहाणी
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली