YouTube आणि Instagram वर सर्वात पहिला व्हिडिओ

 इंटरनेटच्या (internet)युगात सोशल मीडियावर वापर प्रचंड वाढला आहे. यातही युट्यब आणि इन्स्टाग्रामकडे युजर्सचा सर्वाधिक कल आहे.

पण तुम्हाला माहित आहे का यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सर्वात पहिली व्हिडिओ कोणी पोस्ट केला होत आणि त्याला किती व्ह्यूज मिळाले होते.इंटरनेटच्या (internet)युगात आपल्या कोणताही व्हिडिओ पाहायचा असेल तर सर्वात आधी आपण यूट्यूब (YouTube) उघडतो. तर रिल पाहाण्यासाठी सर्वात जास्त इन्स्टाग्रामचा (Instagram) वापर केला जातो. आजच्या घडीला यूट्यब आणि इन्टाग्रामवर करोडो व्हिडिओ आहेत. युजर्सकडून दररोज लाखो व्हिडिओ पोस्ट केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सर्वात पहिला कोणी आणि कोणता व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळाले होते.

यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ
यूट्यूबवर जगभरातील वेगवेगळ्या विषायांवरचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यूट्यूब इंटरनेटवर सुरु होऊन 19 वर्षाहून जास्त काळ झाला आहे. अशात अनेकांना उत्सुकता आहे ती म्हणजे यूट्यूबर पहिला व्हिडिओ कोणता पोस्ट करण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे यूट्यूबवर सर्वात पहिला व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता तो म्हणजे ‘मी प्राणीसंग्रहालयात’ म्हणजे Me at the zoo या नावाचा. 25 एप्रिल 2005 मध्ये रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी यूट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.

या व्हिडिओ जावेद करीम नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला होता. जावेद करीम हे सॅन दिएगो इथल्या प्राणीसंग्रहालयात फिरण्यास गेले होते. इथे त्यांनी हत्तींबाबत माहिती देणारा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ तुम्हाला jawed यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. केवळ 19 सेकंदाच्या या व्हिडिओ आतापर्यंत 315 मिलिअर व्ह्यूज मिळाले आहेत.

2005 मध्ये यूट्यूब लाँच
14 फेब्रुवारी 2005 मध्ये YouTube लाँच करण्यात आलं. गुगलनंतर यूट्यब ही दुसरी ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग वेबसाईट आहे. सध्याच्या काळात जगभरातील करोडो लोकं यूट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करत असतात.

इंस्टाग्रामचा पहिला व्हिडिओ
सध्याच्या काळात युवा वर्गात इन्स्टाग्रामची प्रचंड क्रेझ आहे. या अॅपवर युजर्स आपले फोटो, व्हिडिओ आणि रिल्स शेअर करत असतात. अनेक जण रिल्स बनवून या अॅपच्या माध्यमातून पैसेही कमावतात. पण तुम्हाला माहित आहे का इन्स्टाग्रामवर सर्वात पहिली पोस्ट कोणी आणि का केली होती.

इन्स्टाग्रामवर सर्वात पहिली पोस्ट होती साऊथ बीच हार्बरचा एक फोटो. हा फोटो इन्स्टाग्रामचे फाऊंडर माइक क्राइगर यांनी 16 जुलै 2010 ला संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी पोस्ट केला होता. यानंतर त्याच दिवशी दुसरा फोटो अपलोड करण्यात आला तो इन्स्टाग्रामचेच दुसरे फाऊंडर Kevin Systrom यांनी. त्यांनी आपली प्रेयसी आणि तिच्या श्वानाचा फोटो रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी शेअर केला. अॅप लाँच होण्यापूर्वी त्यांनी हे फोटो शेअर केले होते.

हेही वाचा :

क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; ‘या’ आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागातील हवामान बिघडणार

मंडलिकांच्या एका सवयीवर अंबरीश घाटगेंची 10 हजारांची पैज