विदर्भातील वाघाची लवकरच सह्याद्रीत डरकाळी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (tiger)मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघांना हलविण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे.

नागपूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघांना हलविण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे. (tiger)राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांना सोडण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे शून्य वाघ असलेल्या जंगलात लवकरच वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे.

यात एक वाघ आणि एका वाघिणीचा समावेश आहे. राज्यात सध्या ४४४ वाघ असून त्यातील ९५ टक्के वाघ हे विदर्भातील जंगलात आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी सह्याद्रीत विष्ठेच्या ४४ नमुन्यांचे विश्लेषण केले होते.

त्यातील सात नमुने हे वाघांचे होते. मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. २०१४ च्या गणनेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. मात्र, येथे वाघ कधीच स्थिरावला नाही. दोडा मार्गे वाघ या प्रकल्पात येत होते.

प्रकल्पातील कॉरिडॉर ब्रेक झाल्याने वाघाचे स्थलांतर थांबल्याचे संशोधनात पुढे आले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात २० ते २१ वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही येथे वाघ स्थिरावू शकले नाहीत. आता मात्र, वैज्ञानिक अभ्यास करून अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पात वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे, असा विश्वास महिप गुप्ता यांनी व्यक्त केला.

सह्याद्रीही पन्नाच्या मार्गावर जाणार
मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातही २००८ पूर्वी वाघांची संख्या शून्य झाली होती. तेव्हा तेथील मूर्ती या वनाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कान्हा व्याघ्र प्रकल्पातील वाघांना पन्ना व्याघ्र प्रकल्पात सोडले. आता येथील वाघांची संख्या १०० झालेली आहे.

हेही वाचा :

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?.

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल