आईसोबत फिरते जग, आराध्या बच्चन कधी जाते शाळेत?

ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे(school). ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे आज ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय तिच्या लुकमुळेही चर्चेत राहणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायने 2007 मध्ये बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्याचे आणि अभिषेकचे लग्न अत्यंत खास पद्धतीने पार पडले. ऐश्वर्या आणि अभिषेकची एक मुलगी देखील आहे, जिचे नाव आराध्या बच्चन आहे.

ऐश्वर्या राय(school) हिच्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन ही कायमच स्पॉट होताना दिसते. हेच नाही तर आराध्या बच्चन ही आईसोबत कायमच विदेशात जाताना देखील दिसते. सतत आराध्या आई वडिलांसोबत विदेशात फिरताना दिसत असल्याने नेहमीच विचारले जाते की, आराध्या शाळेत जाते की नाही? नुकताच आईसोबत कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही आराध्या बच्चन पोहचली होती.

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल मोठा खुलासा करताना ऐश्वर्या राय ही दिसली. ऐश्वर्या राय म्हणाली की, आराध्याच्या शाळेला सुट्टी न होऊ देता मी बाहेर जाण्याचे प्लनिंग करते. कधी कोणते फ्लाइट आहे आणि कसे नियोजन करायचे ते सर्व मी शिकले आहे, असे ऐश्वर्या राय म्हणाली. हेच नाही तर सर्व प्लनिंग देखील तिने सांगितले.

ऐश्वर्या पुढे म्हणाली, तुम्ही जर कधी बघितले असेल तर शक्यतो आम्ही ज्यावेळी फिरायला जातो, त्यावेळी सुट्टीच असते, मी तसे नियोजन करते. सोमवारी आराध्याच्या शाळेची सुट्टी होणार नाही, याची काळजी घेते. म्हणजेच काय तर सुट्टीमध्येच आराध्या बच्चन हिला विदेशात ऐश्वर्या राय ही घेऊन जाते, हे तिने स्पष्ट केले.

नेहमीच ऐश्वर्या रायसोबत आराध्या विमानतळावर स्पाॅट होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत आराध्या विदेशात गेली होती. यासोबतच अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनसाठीही बच्चन कुटुंबासोबत आराध्याही गुजरातला पोहचली होती. नेहमीच हा प्रश्न अनेकजण उपस्थित करतात की, आराध्या शाळेत जाते की, नाही? त्यावरच खुलासा करण्यात आलाय.

हेही वाचा :

रेसिपी : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी अटक टाळली

सांगली हादरलं! प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह