संजय दत्तच्या आयुष्यातील चौथ्या लग्नाची चर्चा, ‘या’ अभिनेत्रीचं नाव ऐकून थक्क व्हाल!

‘संजू बाबा’ नावाने प्रसिद्ध असलेला (actor)अभिनेता संजय दत्त 40 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पहिल्या चित्रपटापासूनच त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांचे आई-वडिलही एकेकाळी दिग्गज कलाकार होते.

संजू बाबाच्या (actor)चित्रपटातील अभिनयाइतकीच त्याच्या खासगी आयुष्याचीसुद्धा नेहमी चर्चा असते. संजय दत्तच्या आयुष्यावर ‘संजू’ नावाचा चित्रपटसुद्धा बनवण्यात आला होता. या चित्रपटासाठी संजयने खासगी जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

एका जुन्या मुलाखतीत संजय दत्तने 1993 च्या ‘खलनायक’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘चोली के पीछे’ साठी दीपिका पादुकोण उत्तम पर्याय ठरेल, असं विधान केलं होतं. त्याने दीपिकाच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं.

इतकंच नव्हे, तर विनोदी स्वरूपात असंही म्हणाला होता की, जर त्याचे वय थोडे कमी असते, तर त्याने दीपिकाला चौथी पत्नी बनवण्याचा विचार केला असता. सध्या संजय दत्तच्या या जुन्या मुलाखतीतील हे विधान मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर काही युजर्सनी त्याला ट्रोलही केलं आहे.

संजय दत्तचे खासगी आयुष्य चाहत्यापासून लपलेलं नाही. सिने जगतातील मुन्नाभाईने खऱ्या आयुष्यात तीन वेळा लग्न केलं. पहिलं लग्न 1987 मध्ये अभिनेत्री ऋचा शर्मा यांच्यासोबत केलं. दुर्दैवाने, 1996 मध्ये ऋचा यांचं ब्रेन ट्यूमरमुळे निधन झालं. दुसरं लग्न 1998 मध्ये त्याने मॉडेल आणि एअर होस्टेस रिया पिल्लईसोबत लग्न केलं, परंतु 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिसरं लग्न 2008 मध्ये त्याने मान्यता दत्तसोबत केलं. संजय आणि मान्याता यांना आता जुळी मुळे आहेत.

संजय दत्त लवकरच ‘हाऊसफुल 5’ चित्रपटात झळकणार आहे, हा कॉमेडी चित्रपट 6 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्यासह इतर अनेक कलाकार आहेत.

त्याशिवाय संजय दत्त ‘शेरनी दी कौम’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. संजय दत्त कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’ मध्ये त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

हेही वाचा :

तीन वेळा डोकं भिंतीवर आपटलं, नंतर गळा दाबला खून करुन मृतदेह बाथरुममध्ये लपवला अन्…

शाहिद कपूरच्या ‘देवा’ ट्रेलरला मिळाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा सिग्नल!

सूर्या-सॅमसन बाहेर, जडेजा-शमीचे पुनरागमन, आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ