10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही

भारतातील कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट(new launch) सेडानपासून हॅचबॅकपर्यंतच्या कारच्या विक्रीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कार कंपन्या आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. आता लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत आणि त्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

या वर्षी लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च(new launch) होणार आहेत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, जर तुम्ही नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

महिंद्रा 29 एप्रिल रोजी भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO लॉन्च करणार आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. नवीन मॉडेलच्या डिझाईनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याशिवाय नवे इंटेरिअरही यात पाहायला मिळणार आहे. भारतात महिंद्राची नवीन XUV 3XO कार ही Hyundai Venue, Maruti Brezza, Tata Nexon आणि Kia Sonet शी स्पर्धा करेल.

स्कोडा लवकरच भारतात आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. यात 1.0L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सने सुसज्ज असेल. सध्या त्याचे नाव समोर आलेले नाही.

Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Venue चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन मॉडेलचे कोड नाव Q2Xi आहे. नवीन मॉडेलच्या डिझाईनपासून त्याच्या इंटीरियरपर्यंत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.

हेही वाचा :

कोल्हापूर पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यसाठा केला जप्त

Alexaच्या मदतीने मुलीनं वाचवला बहिणीचा जीव; आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर

रेल्वे तिकीटचं नाही तर स्टेशनबाहेर तांदळासह पिठाची स्वस्तात करा खरेदी