हे आहेत प्रवक्ते पक्षाचे! बोलताना भान नसे कशाचे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आपल्या पाक कलेचे कौतुक होत नाही(party supplies). योग्य मोबदला दिला जात नाही. म्हणून एखादा आचारी जेवनात मीठ जरा जास्त टाकून सगळेच खाद्यपदार्थ खारट किंवा बेचव करून टाकतो. असाच प्रकार सर्वच राजकीय पक्षाचे अधिकृत आणि अनधिकृत प्रवक्ते करत असतात. त्याचा त्रास पक्षाला, त्याच्या नेत्यांना होत असतो. मग लोक निंदा टाळण्यासाठी, पक्षावर होणाऱ्या टीकेला पक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी”हे आमच्या पक्षाचे मत नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे”असा खुलासा करून वेळ मारून न्यावी लागते. महायुतीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रवक्त्यांची जादा बोलण्याची खुमखुमी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच जिरवली.

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे(party supplies) गटाचे संजय शिरसाठ, राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचे अमोल मिटकरी, भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार हे प्रवक्ते आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे रोहित पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत हे प्रवक्ते आहेत किंवा असावेत. वंचित आघाडीचेही कुणीतरी प्रवक्ते आहेत पण ते क्वचित दिसतात. प्रकाश आंबेडकर हेच सतत मीडियासमोर दिसतात.

संजय राऊत, सुषमा अंधारे हे ठाकरे गटाचे नेते, उपनेते आहेत. त्यांच्या शिवसेनेचा प्रवक्ता नेमका कोण आहे हे समजून येत नाही पण राऊत आणि अंधारे हेच प्रवक्ते असावेत. कारण तेच मीडियासमोर सतत बोलत असतात. संजय राऊत हे कधी कधी शरद पवार गटाचे, महाविकास आघाडीचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे बोलत असतात. शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा म्हटल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यांच्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुषमा अंधारे पुढे येतात. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मोठे अडचण करून टाकली होती.

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट असले तरी काँग्रेस मधून शिंदे गटात आलेले जनार्दन वाघमारे हे राखीव प्रवक्ते आहेत. पूर्वी ते राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रवक्ते होते. शिरसाट हे सुद्धा महायुतीचे प्रवक्ते असल्यासारखे अनेकदा बोलत असतात. ते पक्षाची भूमिका कमी मांडताना तर राजकीय भाकीते करताना जादा दिसले. भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार, प्रवीण दरेकर हे सुद्धा अनेकदा प्रवक्त्याच्या भूमिका दिसतात.

अजितदादा गटाचे अमोल मिटकरी हे सुद्धा प्रवक्ते म्हणून ज्यादाच व्यक्त होताना दिसतात. महायुती मध्ये लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या बैठक होत असताना या तिघांनीही मीडियासमोर बेताल वक्तव्य केली होती. महायुतीत जणूकाही बेबनाव निर्माण झाला आहे असे वातावरण तेव्हा त्यांनी निर्माण केले होते. वास्तविक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून देशाचे संविधान धोक्यात असल्याचा जोरदार प्रचार सुरू करण्यात आला होता तेव्हा या महायुतीच्या प्रवक्त्यांनी सडेतोड उत्तर देऊन संविधान विषयक प्रचार मोडून काढणे आवश्यक होते. निवडणूक निकालानंतर आत्मचिंतन करण्याऐवजी या प्रवक्त्यांनी ब्लेम गेम सुरू केला. महा येथे अंतर्गत एकमेकांवर पराभवाचे खापर त्यांनी फोडले. त्याबद्दल महायुतीचे घटक पक्षाचे नेते प्रवक्त्यांवर नाराज झाले.

शिंदे अजितदादा गटाच्या आणि भाजपच्या(party supplies) प्रवक्त्यांनी मीडियासमोर तोंड उघडताना महायुतीची हानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. लोकांच्या समोर चुकीचा संदेश गेला नसला पाहिजे. बोलायची खूमखुमीच असेल तर नेत्यांची परवानगी घेऊन मीडियासमोर जावे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच प्रवक्त्यांना फटकारले आहे. महायुतीमध्ये नितेश राणे हे सुद्धा कधी कधी प्रवक्त्याच्या भूमिकेचा दिसतात पण ते केवळ संजय राऊत यांच्यावरच बोलण्यासाठी सिद्ध आणि प्रसिद्ध आहेत.

महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा तत्सम पक्ष संघटनांचे प्रवक्ते हे अनेकदा पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन बोलताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे प्रामुख्याने दिसले. प्रवक्त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र नेहमीच बुचकळ्यात पडत आलेली आहे. या प्रवक्त्यांच्यामुळे राजकिय पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे कळत नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात नेत्यांच्या पेक्षा त्यांच्या प्रवक्त्यांनी वैचारिक गोंधळ घातलेला दिसतो. त्यामुळे ज्या त्या पक्षाच्या नेत्यांना”ही आमची भूमिका नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे”अशा प्रतिक्रिया द्याव्या लागतात.

हेही वाचा :

रोहित नाही तर… श्रीलंका दौऱ्यावर ‘हा’ पठ्ठ्या असणार टीम इंडियाचा कर्णधार? 

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? सरकारची डोकेदुखी वाढली

 विधानसभेपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला ‘पॉवर’! निवडणूक आयोगाचा ‘तो’ निर्णय ठरणार गेमचेंजर