1 मे पासून ‘हे’ नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

मुंबई : आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे(rullet). हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकांचे नियम बदलणार आहेत. एलपीजी सिलिंडरचाही भाव बदलण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे. त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल. येत्या 1 मेपासून अनेक नियमांत बदल होणार आहे.

येस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या 1 मेपासून(rullet) काही नियम बदलणार आहेत. येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांवरील किमान सरासरी ठेवीमध्ये (मिनिमम अॅव्हरेज बँलेन्स) बदल करण्यात आला आहे. येस बँकेच्या प्रो मॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम अॅव्हरेज बँलेस 50,000 रुपये होणार आहे. सेव्हिंग अकाऊंट प्रो प्लस Yes Respect SA तसेच Yes Essence SA या खात्यांमध्ये मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स 25,000 रुपये करण्यात आले आहे. Account PRo प्रकारच्या बँक खात्यात दहा हजार मिनिमम बॅलेन्सची अट ठेवण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेचेही येत्या 1 मेपासून अनेक नियम बदलणार आहेत. ही बँक सेव्हिंग खात्यांच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदल करणार आहे. तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर 99 रुपये, शहरी भागातील ग्राहक असाल तर 200 रुपये फी (प्रतिवर्ष) द्यावी लागणार आहे. तुम्हाला बँकेचे 25 पानांचे चेक बुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 25 पेजनंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला 4 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला आयएमपीएसने एक हजार रुपयांपर्यंतचे ट्रान्जेक्शन करत असाल तर प्रति ट्रान्जेशन 2.50 रुपये द्यावे लागतील. 1 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत ट्रान्जेशन करत असाल तर पाच रुपये प्रति ट्रान्जेशन फी द्यावी लागेल.

HDFC ही बँक खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेडकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडीय योजना म्हणजेच एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना राबवली जाते. या योजनेच्या मुदतीत 10 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्क्यांचं अतिरिक्त व्याज देत आहे. या योजनेनुसार ग्राहकांना 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडी स्कीम वर 7.75 टक्के व्याज दराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांत बदल करते. त्यामुळे एक मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (23-04-2024)

पराभवाची परतफेड करण्यास चेन्नई सज्ज! LSG विरुद्ध 5 दिवसांत दुसरा सामना

मोठी बातमी! ‘हा’ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? अजित पवारांची ताकद वाढणार!