मोदींच्या चेहऱयावर जिंकतात, मग मिंधेंचे उमेदवार का कापता?

मोदींच्या चेहऱयावर लोकसभेचे सर्व उमेदवार(candidate) निवडून येतात, असा दावा भाजपकडून केला जातोय, मग मिंधेंसोबत गेलेल्या खासदारांना तिकीट का मिळत नाही? त्यांना तुम्ही निवडून आणू शकत नाही का, असा सवाल शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. भाजपकडून निगेटिव्ह रिपोर्टचा फार्स केला गेला. त्या माध्यमातून मिंधेंच्या उमेदवारांचे पत्ते कट करण्यात आले आहेत, असा गौप्यस्पह्ट अनिल परब यांनी केला.

देशात आणि राज्यात केवळ भाजप आहे. विरोधी पक्ष असून नसल्यासारखे असल्याचा पोकळ दावा भाजप करत आहे, मात्र विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमुळे भाजपला घाम फुटला आहे. महाराष्ट्रातील प्रचारसभांसाठी त्यांना थेट पंतप्रधान, पेंद्रीय गृहमंत्री,(candidate) राष्ट्रीय अध्यक्षांना वारंवार आणावे लागत आहे. त्यामुळे 400 पार चार घोषणा किती पोकळ आहे, याची जाणीव आता जनतेलाही झाली आहे. मिंधे गटाच्या पोकळ वल्गनाही आता लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परब म्हणाले, सर्वेक्षणाच्या निगेटिव्ह रिपोर्टचे कारण वारंवार सांगितले जात आहे. समजा जर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरीही चेहरा मोदींचाच असेल. त्यामुळे भाजपने मिंधेंना 13 जागा द्यायलाच हव्या होत्या. कारण त्यावेळीदेखील ते मोदींच्या नावावर निवडून आले होते, असा दावा त्यांनी केला होता. निगेटिव्ह रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही उमेदवारी का कापता? निगेटिव्ह रिपोर्टच्या नावाखाली मिंधेंच्या उमेदवारांची कत्तल सुरू आहे. तुम्ही 13 जागा राखू शकला नाही, तुमच्या उमेदवारांना उमेदवारी देऊ शकला नाही. भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधली, पण त्यांचीच उमेदवारी गेली, असे परब म्हणाले.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पह्डली. त्यांच्या मूळच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी आसुरी आनंद मिळाला, पण आता तेच मूळचे कार्यकर्ते सतरंज्या उचलताना दिसत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांसाठी पायघडय़ा घातल्या जातात, अशी टीका अनिल परब यांनी केली.

2014 साली युती कुणी तोडली या प्रश्नाला अनिल परब यांनी चोख उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यावेळी तर आम्ही काँग्रेससोबत नव्हतो, त्यावेळीही आम्ही हिंदुत्व सोडले नव्हते. भाजपची ताकद वाढल्याचे त्यांना समजल्यानंतर शिवसेनेला सोडले. भाजपने विश्वासघात केला. त्यामुळे आम्ही भाजपला सोडले, हा आरोप चुकीचा आहे.

हेही वाचा :

मुंबईसाठी प्लेऑफचं गणित किचकट, पाहा कशीये पाईंट्स टेबलची स्थिती?

खासदारकीला पराभूत उमेदवारास आमदारकीची लढाई खूप कठीण!

पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार;