Jio चा हा रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त! आता कमी किंमतीत मिळणार जुने फायदे

जिओ युजर्ससाठी एक आनंदाती बातमी आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमतीत बदल केला आहे. रिलायन्स जिओने 448 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली आहे. आता सर्व युजर्सच्या मनात असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिचार्ज प्लॅनची किंमत कमी झाली म्हणजे फायदे देखील कमी झाले आहेत का? तर नाही.

कंपनीने रिचार्ज प्लॅनची किंमत कमी केली असली तरी त्याचे फायदे मात्र कमी झाले नाहीत. युजर्सना आता कमी किंमतीत सर्व जुने फायदे मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत किती रुपयांनी कमी झाली आहे आणि या प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने 448 रुपयांच्या रिचार्ज(recharge) प्लॅनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सना 448 रुपयांचा व्हॉइस-ओन्ली रिचार्ज प्लॅन आता 445 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणताही डेटा पॅक मिळणार नाही. पूर्वी हा प्लॅन 448 रुपयांना उपलब्ध होता. म्हणजे आता त्यावर तीन रुपये कमी झाले आहेत.

सध्याचा जिओचा 448 रुपयांचा व्हॉइस-ओन्ली प्लॅन मूळतः 458 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु नंतर त्याची किंमत 10 रुपयांनी कमी करण्यात आली. आता पुन्हा एकदा या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी करण्यात आली आहे. जिओने 448 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 3 रुपयांनी कमी करून 445 रुपये केली आहे. काही दिवसांपूर्वी या प्लॅनवर 10 रुपये कमी करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा किंमतीत कपात करण्यात आल्यामुळे हा रिचार्ज प्लॅन 445 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

त्याचप्रमाणे, 1958 रुपयांच्या व्हॉइस-ओन्ली पॅकची किंमत 1748 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची होती, मात्र आता या किंमतीसोबत या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील कमी करून 336 दिवसांची करण्यात आली आहे. जिओच्या 445 रुपयांच्या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस असे फायदे मिळतात.

जिओ रिचार्ज(recharge) प्लॅनमध्ये युजर्सना अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे फायदे देखील ऑफर केले जातात. ज्यामध्ये ZEE5, JioCinema Premium, SonyLIV, Lionsgate Play, Kancha Lanka, Discovery+, SunNXT, Hoichoi, Fancode, Planet Marathi आणि Chaupal यांचा समावेश आहे. यासोबतच JioTV आणि JioCloud देखील उपलब्ध आहेत.

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन आता पुन्हा एकदा टेलिकॉम कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध झाला आहे. यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. तसेच तुम्हाला 300 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहेत.

या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि Jio Cloud चा अ‍ॅक्सेस मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये JioCinema प्रीमियम सेवा ऑफर केली जात नाही. हा सध्या जिओचा सर्वात किफायतशीर पॅक आहे. ग्राहक पर्यायीरित्या 199 रुपयांचा प्लॅन निवडू शकतात. या प्लॅनमध्ये 18 दिवसांची सेवा व्हॅलिडिटी, दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दररोज मिळतात.

हेही वाचा :

अहिल्यानगर मध्ये कुस्ती परंपरा झाली “धोबीपछाड”

एसटी प्रवास: कोणाला मिळते मोफत सुविधा आणि कोणाला किती सवलत?

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, आठवा वेतन आयोग लांबणीवर?