कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
श्रीमती अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान मंत्री (agriculture)धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले.लिखित आणि सही शिक्क्याचे पुरावे देऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना”हा सूर्य आणि हा जयद्रथ”दाखवला आहे. आता तरी किमान धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला जाईल अशी सामान्य माणसाची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. श्रीमती दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारवर दबाव निश्चित वाढला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात धनंजय मुंडे हे कृषिमंत्री होते.
या सरकारच्या वतीने किंवा सध्याच्या सरकारकडूनही आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी कसे आहोत हे सांगितले गेले होते आणि आजही तसेच सांगितले जाते आहे. काल आणि आजही धनंजय मुंडे मंत्री होते आणि आहेत. त्यांनी कृषिमंत्री म्हणून खरेदीचे काही नियम बदलले होते आणि अशा प्रकारचे नियम बदलण्याची खरोखरच गरज होती काय असा सवाल त्यांना काही दिवसापूर्वीच न्यायालयाने केला होता. खरेदी विषयक नियमात बदल करून धनंजय मुंडे यांनी ते कृषिमंत्री असताना अनेक गोष्टी अव्वाच्या सव्वा किमतीने खरेदी (agriculture)केल्या आणि त्यातून जवळपास 275 कोटी रुपयांचा त्यांनी घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मंगळवारी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्वस्थता वाढली आहे.
नॅनो युरियाची एका बाटलीची किंमत बाजारात 92 रुपये आहे आणि हीच बाटली 220 रुपयांना खरेदी केली आहे. अशा सुमारे 19 लाख बाटल्या चढ्या दराने खरेदी केल्या गेल्या होत्या.
बाजारात फवारणी पंप 2400 रुपयांना मिळतो, तोच फवारणी पंप साडेतीन हजार रुपयांना विकत घेतला गेला. अशाप्रकारे 275 कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्यासाठी होते ते उधळले गेले आहेत आणि हे पैसे कोणाच्या खिशात गेले आहेत हे सांगण्याची गरज नाही.अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर पुराव्यासह आरोप केल्यानंतर शासनावर दबाव नक्की वाढलेला आहे. या दबावाचे रूपांतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात होतो काय इकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्मीक कराड प्रकरणानंतर
मंत्री धनंजय मुंडे हे वादग्रस्त बनत चालले आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.अंजली दमानिया यांनी सुद्धा हीच मागणी लावून धरली आहे. अजित दादा पवार यांनी, पुरावे असतील तर मी कोणाचीही गय करणार नाही
कठोर कारवाई करणारच असे अनेकदा सांगितले आहे. आणि आता तर अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणाचा चेंडू त्यांच्या कोर्टात गेलेला आहे.
त्यामुळे त्यांना कारवाई करावीच लागेल. पुराव्यासह गंभीर आरोप केल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात राहणार असतील तर मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस(agriculture) यांचीतसेच भारतीय जनता पक्षाचीमोठी अडचण होणार आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची एक हाती सत्ता होती. सुरेश कलमाडी हे केंद्रीय क्रीडामंत्री होते. त्यांच्या काळात भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तेव्हा या स्पर्धेसाठीच्या आयोजनासाठी
करण्यात आलेल्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. भाजपच्या नेत्यांनी सुरेश कलमाडी यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचा राजीनामा घेण्यात आला होता, इतकेच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून तसेच महायुतीच्या स्वपक्षीय आमदारांच्या कडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता त्यावर निर्णय काय घ्यायचा हे भाजपने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले पाहिजे.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत