तुरुंग व्यवस्थेचे तीन तेरा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह(system) नऊ कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कठोर कारवाईचे सर्वसामान्य माणूस स्वागत नक्कीच करेल मात्र त्याचबरोबर तुरुंग व्यवस्थेचे तीन तेरा कसे वाजलेले आहेत याचे विदारक दर्शन तुरुंग व्यवस्थापनानेच अप्रत्यक्षपणे घडवले आहे.कळंबा कारागृहाला सुमारे 30 वर्षांपूर्वी मध्यवर्ती कारागृह असा दर्जा देण्यात आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यातील आजन्म कारावासाची शिक्षा झालेले कैदी कळंबा मध्यवर्ती कारागृहात ठेवले जातात. सध्या यामध्ये कारागृहात क्षमतेपेक्षा जादा कैदी आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले अंडर ट्रायल कैदी, दोष सिद्धी झालेले कैदी, परदेशी कैदी या कारागृहात आहेत. अंडर ट्रायल कैद्यांची संख्या जास्त आहे.

‌कळंबा मध्यवर्ती कारागृहात एकेकाळी खलिस्तानवादी(system) कैदी होते, मुंबई टोळी युद्धातील कैदी होते, बापू बिरू वाटेगावकर यासारखा कैदी या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तेव्हा या कारागृहात सारे काही आलबेल होते. कैद्यांमध्ये शिस्त होती. गुन्हे सदृश्य घटना या कारागृहात घडत होत्या पण त्या गांभीर्याने घ्याव्यात अशा नव्हत्या.

गेल्या काही वर्षांपासून मात्र कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे अशा काही घटना घडत घडताना दिसत आहेत. पुणे येथील गजा मारणे या टोळीतील काहीजण मोक्का अंतर्गत कळंबा कारागृहात होते. या टोळीतील सोमप्रसाद पाटील हा अधून मधून आजारी पडायचा. मग त्याला सीपीआरमध्ये दाखल केले जायचे. तेथे त्याची चंगळ असायची. कारागृहातील वैद्यकीय अधिकारी सोमप्रसाद पाटील याला आजारी पाडायचे. गजा मारणे याची टोळी या कारागृहात होती तोपर्यंत कारागृहातील एका सेलमध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा मांसाहारी पार्टी व्हायची.

गेल्या काही वर्षांपासून या कारागृहात कच्च्या आणि पक्क्या कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. एकाच वेळी 40 ते 50 मोबाईल सापडण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आल्यानंतर तुरुंग प्रशासन खळबडून जागे झाले. वरिष्ठ अधिकारी पातळीवर चौकशी सुरू झाली. अनेक कैद्यांचे जाब जबाब घेण्यात आल्यानंतर घेण्यात आल्यानंतर, कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेतील बारीक बारीक छिद्रे नव्हे तर मोठाली भोके, किंवा मोठ्या फटी दिसून आल्या. दोन तुरुंग अधिकारी आणि नऊ कर्मचारी यांच्यावर त्याचा ठपका ठेवून त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कठोर कारवाई आहे. या कारवाईचे कोणीही स्वागतास करेल पण त्याचबरोबर अशा प्रकारच्या कारवाईमुळे तुरुंग व्यवस्थेचे तीन तेरा कसे वाजले आहेत. हे अधिक ठळकपणे पुढे आलेले आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कच्च्या आणि पक्क्या कैद्यांच्या पर्यंत गांजासारखे अमली पदार्थ पोहोचवले जातात. याला तुरुंग प्रशासन जेवढे जबाबदार आहे तेवढेच स्थानिक पोलीस प्रशासनही जबाबदार आहे. कारागृहात प्रामुख्याने मोबाईल हँडसेट वारंवार सापडले आहेत. याचा अर्थ कैदी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संवाद होत नाही किंवा अशा प्रकारचा संवाद होण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना केली जात नाही. आतील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी तुरुंग प्रशासनानेच सुविधा उपलब्ध करून दिली तर आत मध्ये मोबाईल सापडण्याचे प्रकारच घडणार नाहीत. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या अत्यंत कठोर कारवाईचा योग्य तो संदेश राज्यातील इतर कारागृहापर्यंत पोहोचेल.

कळंबा मध्यवर्ती कारागृहातून काही वर्षांपूर्वी मुंबई गॅंगवॉर मधील चार खतरनाक कैदी भिंतीवरून खाली उड्या मारून पळून गेले होते. केव्हापासून या कारागृहाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे प्रस्ताव राज्याच्या तुरुंग प्रशासनाकडे पाठवले गेले होते. पण या प्रस्तावांना मंजुरी दिली गेली नाही. सध्या या कारागृहाच्या भिंतीची उंची 22 फूट आहे. आणि बाहेरून आत मध्ये कोणतीही वस्तू सहजपणे फेकली जाऊ शकते. याच पद्धतीने मोबाईलचे हँडसेट किंवा गांजा आत मध्ये फेकला जात होता.

तुरुंगाच्या भिंतीची काटेरी कुंपणे घालून सुरक्षा वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याचे काम हे आता सुरू होईल. कारागृहातील कैद्यांनी मोबाईल हँडसेट च्या माध्यमातून ज्यांच्याशी संवाद साधला होता त्यांची ही सध्या चौकशी केली जाणार असून त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. आता अन्य प्रकारच्या उपाययोजना कारागृह प्रशासनाकडून केल्या जातील पण प्रशासनातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये जी अप प्रवृत्ती रुजली आहे ती कशी काढून टाकणार?

हेही वाचा :

राजकारणातले अतृप्त आत्मे

सांगली : ‘जयंत पाटील काड्या करण्यात आणि…’; माजी आमदाराची टीका

धोनीसोबत प्रेम म्हणजे नावावर भलामोठा डाग..! का केले या अभिनेत्रीने धोनीवर इतके मोठे आरोप?