कैद्यांना मोबाईल देणं भोवलं! कळंबा कारागृहातील 2 अधिकारी आणि 9 कर्मचारी बडतर्फ

कळंबा कारागृहाच्या भिंती अक्षरशः भ्रष्टाचाराने पोखरले आहेत. कारागृहाचे(employees) अधिक्षक क्षमाकांत शेडगे यांनी केलेल्या सर्च मोहिमेत गेल्या 25 दिवसांपासून 80 मोबाईल कायद्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कळंबा कारागृहातील दोन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईनंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ढिसाळ व्यवस्थापन आणि संशयास्पद कारभाराने(employees) वादग्रस्त ठरलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बहुचर्चित मोबाईलप्रकरणी गृहखात्याने दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उच्चस्तरीय चौकशीत दोषी आढळलेल्या कारागृहातील दोन वरिष्ठांसह 9 कर्मचारी अशा 11 जणांवर कर्तव्यातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह प्रशासन) अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार दोन वरिष्ठ तुरुंगाधिकार्‍यांसह 11 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. आणखी काही अधिकारी, कर्मचारी कारवाईच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बडतर्फ झालेल्यात कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, रवी पवार, वैभव पाटील, अनिकेत आल्हाट, वैशाली पाटील, सुहास वरखडे, संजय टिपुगडे, स्वप्नील हांडे यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोन अधिकार्‍यांसह पाच कर्मचार्‍यांची वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी ठरल्यास संबंधित कारवाईच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. कळंबा कारागृहातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसह 11 जणांना एकाच वेळी बडतर्फ करण्यात आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कळंबा कारागृहाचे तत्कालीन प्रभारी अधिक्षक पांडुरंग भुसारे यांची पुणे येथील येरवडा येथे तर उपअधिक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. भुसारे व आडे हे अधिकारी अधिक्षक दर्जाचे असल्याने त्याच्यावरील कारवाईचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. संबंधितांवर राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांकडे मोबाईल, बॅटर्‍यासह चार्जर तसेच वारंवार गांजाचा पुरवठा होत असल्याने कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत वरिष्ठाधिकार्‍यांसह 15 जणांचे विशेष पथक नियुक्त केले होते. पथकाने 30 मार्चपासून दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रांत कारागृहातील कैद्यांची झडती घेतली. बरॅकची तपासणी केली असता 25 दिवसांत 80 पेक्षा अधिक मोबाईल संच, सिमकार्ड, चार्जर अशा संशयास्पद वस्तू विशेष पथकाच्या हाताला लागल्या. प्रशासनाच्यावतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्यादीही दाखल करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :

राजकारणातले अतृप्त आत्मे

सांगली : ‘जयंत पाटील काड्या करण्यात आणि…’; माजी आमदाराची टीका

धोनीसोबत प्रेम म्हणजे नावावर भलामोठा डाग..! का केले या अभिनेत्रीने धोनीवर इतके मोठे आरोप?