TVशोच्या मोहात अभिनेत्यानं नाकारली 600 कोटींची फिल्म

कलाकार नेहमीच चांगल्या भुमिकेच्या आणि चांगल्या सिनेमाच्या शोधात असतात. काहींना चांगले सिनेमे आणि भुमिका मिळतात ज्याचं ते सोनं करतात पण काही जण आलेली संधी नाकारुन मोठ्या यशाला नाकारतात. असंच काहीसं झालं आहे एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याबरोबर. नितीश तिवारी यांच्या रामायण या सिनेमासाठी त्याची निवड झाली होती. मात्र त्यानं एका टेलिव्हिजन शोमुळे त्यानं ती ऑफर नाकारली आणि मोठी संधी हातातून गेली. अभिनेत्याला त्याच्या या चुकीचा आता पश्चाताप होतोय.

नितीश तिवारी यांच्या रामायण सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर रामाची भुमिका साकारतोय तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भुमिकेत आहे. KGF स्टार यश रावणाची भुमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भुमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. रामायण मालिकेत रामाची भुमिका साकाराणे अरुण गोविल या सिनेमात राजा दशरथाची भुमिका करणार आहे. इतकी मोठी स्टारकास्ट असलेल्या सिनेमात काम करण्याची अभिनेता आदित्य देशमुखला मिळाली होती.

अभिनेता आदित्य देशमुखनं रामायण सिनेमासाठी ऑडिशन दिली होती. त्यात तो पास झाला आणि त्याला राजा दशरथाच्या तरुणपणीची भुमिका ऑफर करण्यात आली होती. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सांगितलं, “रामायण सिनेमात राजा दशरथाची भुमिका साकारण्यासाठी मुकेश छाबडा यांची टीम खूप उत्साही होती. पण मी सुहागन या मालिकेसाठी माझ्या डेट्स दिल्या. म्हणून सिनेमा नाकारला”.

आदित्य पुढे म्हणाला, “सिनेमा नाकारल्यानं मला पश्चाताप झालाय. मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती. मालिका संपल्यानंतर मी टीमला कॉल केला आणि मी आता फ्री आहे, सिनेमा करु शकतो. तेव्हा ते माझ्यावर हसले. पण ते माझा त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी विचार करतील असं म्हणाले”.

रामायण हा सिनेमा दोन भागात तयार होणार आहे. सिनेमाचा पहिला भाग हा 2025च्या दिवाळीत रिलीज होणार आहे असं म्हटलं जात आहे. सिनेमाला ऑस्कर विजेते एआर रहमान यांचं संगीत असणार आहे, असंही म्हटलं जात आहे.