विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

बाटलीच्या आतून पेस्ट स्वरूपातील सोने(gold) तस्करी प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका खासगी पंपनीच्या कर्मचाऱयाला पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) पकडले. त्याच्याकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2.4 कोटी इतकी आहे.

विमानतळावर आज सकाळी विमानतळावर काम करणारा कर्मचारी हा बाहेर पडला. त्याच्याकडे स्टीलची बाटली होती. गस्तीवर असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी ती बाटली उचलली. (gold)

ती बाटली नेहमीपेक्षा जड असल्याचे जवानांच्या लक्षात आले. ती बाटली तपासणीसाठी स्पॅनिंग मशीनमध्ये टाकली. त्या बाटलीमध्ये काही संशयास्पद वस्तू लपवल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या बाटलीची तपासणी केली.

बाटलीमध्ये पेस्ट स्वरूपात सोने होते. याची माहिती सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयांना दिली. त्या कर्मचाऱयाला पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क अधिकाऱयाच्या स्वाधीन केले.

हेही वाचा :

फसवे बारामती मॉडेल?

सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार, एक काका, दुसरे दादा…; राऊतांचा निवडणूक आयोगावरही घणाघात

वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन ‘मविआ’समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!