मोदींनी भ्रष्टाचाराची सर्वात मोठी योजना आणली; प्रियांका गांधी यांनी डागली तोफ

मोदी स्वतःला खूप प्रामाणिक(honest) म्हणवतात, पण, त्यांनी या देशात भ्रष्टाचाराची सर्वात मोठी योजना आणली. देणगी देणाऱया व्यक्तीचे नाव गुप्त राहील अशी ही योजना होती.

या योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या बडय़ा मित्रांकडून देणगी घेतली. आधी छापा टाकला, नंतर देणग्या घेऊन तपास थांबवला.(honest) गुजरातमधील पूल कोसळण्याच्या घटनेचे त्यांनी उदाहरणही दिले. अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. छत्तीसगडमधील कोरबा लोकसभेच्या चिरमिरी येथे त्या प्रचार सभेत बोलत होत्या.

यावेळी प्रियांका गांधी यांनी कोविशिल्ड या कोविड लसीच्या अहवालाचाही उल्लेख केला. लसीकरण झाल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला, काही आजारी पडले. पूर्वी प्रमाणपत्रे दिली जात असत तेव्हा त्यावर मोदीजींचा फोटो असायला, पण, आता या प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो काढून टाकल्यामुळे यापुढे मिळणाया प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो दिसणार नाही, असा टोलाही प्रियंका गांधी यांनी लगावला.

मोदींच्या सरकारमध्ये गरिबांवर अन्याय झाला पण, अब्जाधीश आणि उद्योगपतींवर नाही, त्यांनी आपल्या पक्षात बडय़ा भ्रष्ट नेत्यांचा समावेश केला. हे इतर पक्षांचे नेते होते. आधी त्यांच्यावर दबाव आणून तपास सुरु केला. त्यानंतर त्यांना पक्षात घेतल्यावर ते दुधासारखे पांढरे शुभ्र झाले. असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.


…तुम्हाला बलिदानाची महती काय समजणार

मुरैना ः माझ्या वडिलांना त्यांच्या आईकडून संपत्ती नव्हे, हौतात्म्याचा वारसा मिळाला, असे भावोद्गार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथे काढले. पण, तुम्हाला या बलिदानाची आणि हौतात्म्याची महती समजणार नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढवला. जेव्हा मोदीजी इंदिराजींसारख्या स्त्राrबद्दल मूर्खपणाचे बोलतात, जेव्हा मोदीजींना देशप्रेमाची भावना न दिसता केवळ घराणेशाहीचे राजकारण दिसते, तेव्हा त्यांना हा त्याग समजू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. मोदीजी माझ्या वडिलांना देशद्रोही म्हणतात तेव्हा मी त्यांना बलिदानाची महती कशी समजावून सांगू, असे म्हणत त्यांनी मोदी यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

हेही वाचा :

शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा समावेश; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार, एक काका, दुसरे दादा…; राऊतांचा निवडणूक आयोगावरही घणाघात

वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन ‘मविआ’समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!