कोल्हापूर: पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला आलेल्या पर्यटकांना मोठा(river camp) फटका बसला आहे. ताम्हिणी घाटानंतर कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दूधगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.
कोल्हापुरातील दूधगंगा नदीमध्ये दोन तरुण(river camp) बुडाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील निपाणी येथे राहणारे तरुण काळमवाडी येथी दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. पावसाळी पर्यटनासाठी १३ जण निपाणी होऊन काळमवाडी परिसरात आले होते. या १३ जणांपैकी २ तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
पुण्यातील ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या तरुणाचा वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा तरुण त्याच्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील स्वप्नील धावडेने ताम्हिणी घाटातील पाण्यात उडी मारली. त्यानंतर हा तरुण जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
स्थानिक प्रशासनाने या घटनेनंतर नदीच्या आसपासच्या भागात सुरक्षा उपाय वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सूचना दिल्या जात आहेत, परंतु या दुर्दैवी घटनेने पावसाळी पर्यटनाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटाला धक्का
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका
गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन… आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर