खड्डेमय रस्त्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ;उपचारासाठी वेळेत रुग्णालयात पोहोचवू शकले नाही

पैठण (ता. १ ऑगस्ट): पैठण तालुक्यातील मोती तांडा येथे एका तरुणाला विजेचा (electricity)धक्का बसून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही आणि त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रमोद संपत चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. तो तांडा परिसरातील विद्युत डीपीचा फ्यूज बदलत असताना विजेचा शॉक बसून गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला पैठण येथील रुग्णालयात नेण्यासाठी निघाले. मात्र, मोती तांडा ते खेर्डा या रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचू शकली नाही आणि प्रमोद यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

…म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण

जातीपातीचे राजकारण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

गायकाने भर मिटिंगमध्ये मद्य प्राशन केले, टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये राडा; Video