सांगली ,पुणे- साताराला अवकाळी पावसाने झोडपलं..

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस (rain) पडत आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. या पावासामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यामुळे बळीराज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. राज्यात आज पावसाची काय परिस्थीती होती ते आपण

पुणे

पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या आवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पाईट परिसरात पॉलिहाऊसची तीन शेड उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्तर पुणे परिसरातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यात सलग तिस-या दिवशी आवकाळी पावसाने हजेरी लागली. या पावसामुळे उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातारा

साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस (rain) झाला. कालेगावच्या बाजारात या पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. कराड- रत्नागिरी महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूर –

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड येथे गारपिटसह जोरदार पाऊस झाला. याठिकाणी लहान आकाराच्या गारा देखील पडल्या. गारपिटीचा फटका फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणचे शेतकरी चिंतेत आले आहेत.

चिपळून –

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील पेंढाबे गावात केळी बागेचे मोठे नुकसान झाले. संतोष शिंदे यांची ही केळीची बाग आहे. पाच एकरात त्यांनी २५ लाखांच्या केळीची लागवड केली होती. पण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीबाग जमीनदोस्त झाली. यामध्ये त्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले आहे.

बीड –

बीडसह वडवणी आणि धारूर तालुक्यात अवकाळी पावसाने (rain) अक्षरश: धुमाकूळ घातला असून फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या पावसामुळे वातावरात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

बीसीसीआय टीम इंडियाच्या नव्या कोचच्या शोधात..

हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये नोकरीची मोठी संधी