चमचमीत भजी, पकोडे, कुरडया, पापट्या, मेथी आणि आळूवड्या असे विविध पदार्थ खाणे(cancer) सर्वांनाच आवडतं. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक जण दररोज बाहेर तेलात तळलेले वडे आणि समोस्यांवर ताव मारतात. आपण देखील घरामध्ये विविध तळलेले पदार्थ बनवल्यावर उरलेलं महागडं तेल फेकून देत नाही. हे तेल बाकीचे पदार्थ बनवताना किंवा तळताना वापरतात. मात्र असे करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे.
वापरलेलं तेल पुन्हा जेवणात वापरल्याने त्याने कॅन्सरचा(cancer) धोका उद्भवतो, अशी माहिती ICMR ने दिल्याचं वृत्त हिंदूस्तान टाइम्स या वृत्तवाहीने दिलं आहे. एकदा तळून वापरलेलं तेल पुन्हा वापरल्यावर आपल्या हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होतो. तुम्ही जितक्यावेळा तेल गरम कराल तितक्यावेळा त्यात नवे विषारी घटक तयार होतील.
जास्तवेळा तळलेल्या तेलातील विषारी घटक वाढत जातात आणि याने कॅन्सरचा धोका देखील वाढतो. अशा तेलात फ्रि रॅडिकल्स देखील तयार होतात. त्याने लिव्हर खराब होण्याची देखील शक्यता असते, अशी माहिती ICMR च्या नव्या अभ्यासातून समोर आली आहे.
तेलात पदार्थ तळून झाल्यावर बऱ्याच व्यक्ती ते तेल फेकून देत नाहीत तसंच ठेवतात. वापरलेलं तेल पुन्हा वापरल्यावर त्या भाज्यांना चव राहत नाही. त्यामुळे काही घरात पुन्हा तेच पदार्थ बनवायचे असल्यास हे तेल वापरतात. समजा तुम्ही आज कुरडया तळल्यात त्यानंतर तुम्ही याचं उरलेंल तेल एका डब्ब्यात ठेवलं. आता आजच कुरडया खाल्ल्यानंतर आपण पुन्हा ३ ते ४ दिवस किंवा मग पुढच्या आठवड्यातच पुन्हा कुरडया खाणे पसंत करतो.
जर तुम्ही इतके जास्त दिवस तळलेलं तेल वापरलं तर नक्कीच तुम्हाला घसा खवखवणे आणि यासह कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला हे तेल वापरयाचेच असेल तर ते फिल्टर करून गाळून घ्या आणि नंतर वापरा. मात्र शक्यतो एकदा वापरल्यानंतर उरलेलं तेल फेकून देणे बेस्ट आहे.
हेही वाचा :
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल
आम्हाला अटक करा..’ CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा
सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…