लोकसभेच्या धुळे मतदारसंघात यंदा होणारी निवडणूक(opportunity) वैशिष्ट्यपूर्ण आणि चुरशीची होणार आहे. प्रस्थापित भाजप विरूध्द काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम रिंगणात असणार आहे. यात
ने मुस्लीम समाजास उमेदवारीची संधी देत मत विभाजनाच्या डावपेचांना सुरूवात केल्याचे मानले जात आहे. या रणनितीचा भाजप, काँग्रेसच्या उमेदवाराला काहीअंशी फटका बसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वाधिक मराठा- पाटील समाजानंतर मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे.वंचित
तसेच आदिवासी, दलित व इतर समाज निर्णायक(opportunity) ठरत असतात. यातील जातीय समीकरणे आणि मतांच्या विभाजनातून प्रस्थापितांना शह देण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्ध्यांकडून होत असतो. हाच धागा पकडून वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम समाजाला उमेदवारीची संधी दिल्याचे मानले जाते. यात माजी सनदी पोलिस अधिकारी अब्दुल रहेमान हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार रहेमान यांच्या माध्यमातून मुस्लीम, दलित, आदिवासी समाज आकृष्ट करण्याचा प्रयत्न आहे. मणिपूर येथील घटनेप्रकरणी नाराज आदिवासी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावे, असे नेत्यांना वाटते. शिवाय एमआयएम
उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहे. अशी जातीय समीकरणे मतदारसंघात विणली गेली तर ती प्रस्थापित भाजप आणि काँग्रेसला काहीअंशी फटका देणारी ठरणार आहेत.
भाजपने जातीय समीकरणांचे अवलोकन करत मराठा- पाटील समाजाला उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले आहे. काँग्रेसचा अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. तशीच स्थिती एमआयएम
ची आहे. काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिला आणि वंचित
, एमआयएम
चे उमेदवार रिंगणात आले तर चौरंगी लढतीत मत विभाजन अटळ असेल. त्यामुळे जातीय समीकरणांचा धोका भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांसमोर असेल. त्यातून ते विजय कसा साकारतात, मराठा- पाटील समाज कोणत्या उमेदवाराला झुकते माप देतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघाची २००९ ला फेरपुनर्रचना झाल्यामुळे हा मतदारसंघ खुला झाला. यापूर्वी तो आदिवासी संवर्गासाठी राखीव होता. या कालावधीत कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात २००९ पासून मोदींसह परिवर्तनाची लाट आली. तिने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला. भाजपने जातीय समीकरणांचा आधार घेत मराठा- पाटील समाजाचा उमेदवार देण्यास प्राधान्य दिले.
याउलट प्रतिस्पर्धी कॉंग्रेसने उमेदवारीत अल्पसंख्याक समाजास प्राधान्य देऊनही पराभव स्वीकारावा लागला. मतदारसंघात २००९ मध्ये भाजपने प्रताप सोनवणे आणि २०१४ मध्ये भाजप प्रवेश करणारे डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॉंग्रेसने माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांना जातीय समीकरणाची साथ लाभली नाही आणि पराभव पत्करावा लागला. अशात यंदाच्या निवडणुकीत मतदार राजाचा कौल काय असेल याची उत्कंठा असेल.
हेही वाचा :
“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले
हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं
लग्नाच्या एका महिन्यातच नवऱ्याच्या ‘या’ सवयीमुळे दु:खी नवी नवरी, 1 तास बाथरूममध्ये..