रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंसाचार; जाळपोळ अन् दगडफेक, १८ जखमी

रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचार(violence) झाला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन गटात हाणामारी झालीये. या घटनेमुळे पसिसरात तणावाचं वातावरण आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मेदिनीपूरच्या इग्रा येथे देखील दोन गटांमध्ये(violence) मारामारी झाली. या संदर्भातील अनेक बातम्या आणि जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 18 व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलं, एका महिला आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत.

मिरवणुक सुरू असताना अचानक दोन गट एकमेंकांना भीडले. जाळपोळ तसेच मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. रॅलीमध्ये तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आली असून अतिरिक्त फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे. जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

राज्यात काल रामनवमीनिमित्त सर्वत्र उत्सव सुरू होता. आनंद आणि जल्लोषात अनेक ठिकणी रामनवमी साजरी करण्यात आली. मात्र पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी झालेल्या हिंसाचाराने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर राजकीय वर्तृळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :

खासदार दाजीबा देसाई आणि देशातील निच्चांकी मताधिक्य

भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण

कोल्हापूर : वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहू छत्रपती कुटुंब आणि मंडलिक एकत्र