अधिवास बदलला आणि बिबट्यांची दहशत वाढली

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राधानगरी, दाजीपूर, तिलारी, चांदोली आणि कोयना धरण(habitat restore) क्षेत्र परिसर येथील जंगल क्षेत्र बऱ्यापैकी समृद्ध आहे. त्यास पश्चिम घाट म्हणून जागतिक पर्यावरणात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. जैवविविधतेने नटलेला हा भाग आहे. संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेल्या विविध वन्य जीवांचा, तृणभक्षी आणि मांसभक्षी प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास पश्चिम घाटातील या जंगल भागात आहे. या अधिवास क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव संभ्रमित झाला आहे. परिणामी बिबट्यासारखे वन्यजीव नागरी वसाहतीकडे वळू लागले आहेत. तुम्ही माझ्याकडे याल तर मग मला तुमच्याकडे यावेच लागेल असा संदेशच बिबटे तसेच पट्टेरी वाघ आता माणसाला देऊ लागले आहेत.

तिलारी जंगल परिसरात सहा सात वर्षांपूर्वी क*** वाघाचे(habitat restore)अर्थात ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाले होते. पन्हाळा, राधानगरी, चांदोली या भागात अनेकदा पट्टेरी वाघांचे दर्शन झाले आहे. वाघाच्या तुलनेत आता बिबटे उदंड जाहल्याचे चित्र दिसते आहे. जगामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे आणि त्यामुळेच जंगल क्षेत्र बऱ्यापैकी सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन विपुल प्रमाणावर मानवी जीवाला उपलब्ध आहे. पर्यावरण संतुलनासाठी किमान 33% जंगल नक्षत्र असले पाहिजे. पण ते सध्या 20 टक्क्यावर आले आहे. आणि वाघांची संख्या वाढल्याने ही किमान पातळीवर सुरक्षित व समृद्ध आहे आणि राहणार आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात वाघांपेक्षा बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि त्यांचा वावर नागरी वस्ती नजीक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढलेले आहेत, उपासमारीने त्यांचा मृत्यू होऊ लागला आहे शिवाय बिबट्याचे सहज दर्शन ग्रामीण भागात होत राहिल्याने एकूण बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याचे सिद्ध होते. कोल्हापूर शहराजवळच्या ग्रामीण भागात बिबटे आता वारंवार दिसू लागले आहेत. पन्हाळा तालुक्यातील साळवाडी गावात बिबट्याचे अतिक्रमण झाले असून तेथील गोठ्यातून त्यांनी वासरू पळवल्याची घटना घडल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वाढलेल्या संख्येवर नियंत्रण आणणे हे वनविभागा समोरचे सध्याचे मुख्य आव्हान आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अभयारण्य अर्थात संरक्षित जंगलामध्ये पट्टेरी वाघ तसेच बिबटे यांचा नैसर्गिक अधिवास आहे. या नैसर्गिक अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणाने वाढलेला आहे. त्यामुळे या जंगलातील बिबट्यासारखे प्राणी आपला मूळचा अधिवास सोडून नागरी वसाहतीकडे येऊ लागले आहेत. कोल्हापूर जिल्हा हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. इथे उसाचे पीक उदंड आहे. उसाचे उभे पीक किमान आठ ते दहा महिने असते. ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर बिबटे तेथून दुसरीकडे जातात. ऊस जळाल्यानंतर किंवा उसाचे खोडवे जाळल्यानंतर किंवा वनवा लागल्यानंतर बिबटे हे तेथून बाहेर नागरी वसाहतीकडे वळतात.

घनदाट जंगलातील अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे बिबट्यांनी उसाच्या फडात आश्रय घेतला. उसाच्या फडातच मादी बिबट्यांची प्रसूती होऊ लागली. उसाच्या फडातच जन्मास आलेल्या बिबट्यांना उसाचा फड हाच आपला अधिवास आहे असे वाटू लागले. त्यामुळे उसाच्या फडात जन्मलेले बिबटे पुन्हा अधिवास समजून उसाच्या फडातच आश्रय घेऊ लागल्यामुळे ते मानवी वसाहतीच्या अगदी समीप येऊ लागले. बिबट्यांच्या मध्ये काही जनुकीय बदल झाले आहेत. ते आपला घनदाट जंगलातील अधिवास विसरले आहेत. आणि उसाचे फळ हे गाव नजीकच असल्यामुळे बिबट्यांचे दर्शन ग्रामीण भागात आता अगदी सहज होऊ लागले आहे.

गावठाण वाढू लागल्यामुळे गावठाणा नजीकच्या पिकाऊ जमिनीत बांधकामे होऊ लागली. निवासी संकुले होऊ लागली. फॉर्म हाऊसेस होऊ लागली. त्यामुळे बिबट्याच्या बदललेल्या अधिवासाच्या अगदी जवळ माणूस पोहोचला. त्यामुळे बदललेले अधिवासाचे ठिकाणही असुरक्षित वाटू लागल्याने तेथूनही बिबटे आता बाहेर पडू लागले आहेत.

बिबट्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. त्यांचा जन्म दर कमी आणला पाहिजे. मादी बिबट्यांसाठी निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली पाहिजे. बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वन्यजीव कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. एकूणच बिबट्यांची वाढलेली संख्या ही मानवी जीवासाठी धोक्याची घंटा आहे. पण ही धोक्याची घंटा मानवनिर्मितच आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहू छत्रपती कुटुंब आणि मंडलिक एकत्र

भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण

रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंसाचार; जाळपोळ अन् दगडफेक, १८ जखमी