आजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरचे अरबट-चरबट खाल्ल्याने अनेकजण लठ्ठपणाच्या(weight) समस्येने त्रस्त आहेत. हा आजार साधा वाटत असला तरी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशात अनेकजण डाएटचा पर्याय निवडतात. मात्र हे हेल्दी पदार्थ अनेकदा आपल्या घश्याखाली उतरत नाहीत. यांची बेचव चव आपल्या मनाला तृप्ती देत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके, चवदार आणि टेस्टी अशा पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत.

चवीबरोबरच आरोग्याचीही(weight) काळजी घ्यायची असेल तर ओट्स ऑम्लेट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत तुम्ही नाश्तायसाठी हा पदार्थ तयार करू शकता. ओट्स ऑम्लेट प्रथिने, फायबर आणि पौष्टिकतेने समृद्ध आहे. तसेच याला बनवण्यासाठी फक्त 10-15 मिनिटे लागतात. हे केवळ चवदारच नाही तर पचनासाठी देखील हलका आहे, यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. याशिवाय याला बनवण्यासाठी फार साहित्य आणि वेळेचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आई कृती.
साहित्य
- ½ कप ओट्स
- 2 अंडी
- ¼ कप दूध
- ½ टीस्पून हळद
- ½ टीस्पून काळी मिरी
- ½ टीस्पून लाल मिरची पावडर
- 1 टीस्पून जिरे
- 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
- ½ कप बारीक चिरलेला कांदा
- ¼ कप बारीक चिरलेली सिमला मिरची
- ¼ कप टोमॅटो
- 2 चमचे कोथिंबीर पाने
- चवीनुसार मीठ
- 1 चमचा तेल किंवा तूप
कृती
- यासाठी सर्वप्रथम, ओट्सचे बॅटर तयार करा, यासाठी ओट्सचा ओलावा काढून टाकण्यासाठी त्यांना हलके भाजा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर बनवा
- आता एका मोठ्या भांड्यात ओट्स पावडर, अंडी आणि दूध घालून चांगले मिसळा जेणेकरून एक गुळगुळीत पीठ बनवा
- आता या पिठात हळद, मिरपूड, लाल तिखट, जिरे आणि आले-लसूण पेस्ट घाला
- आता यात चवीनुसार मीठ टाका आणि पीठ काही मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या
- एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि थोडे तेल किंवा तूप लावा आणि पीठ तव्यावर घाला आणि चमच्याने हलके पसरवा, मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवा, कडा हलक्या तपकिरी रंगाच्या होऊ लागल्यावर, ऑम्लेट उलटा आणि
- दुसऱ्या बाजूला 2 मिनिटे शिजवा
- तुमचा गरमागरम ओट्स ऑम्लेट तयार आहे, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करा
- जर तुम्ही हेल्दी आणि चविष्ट नाश्ता शोधत असाल तर हे ओट्स ऑम्लेट नक्की करून पहा. हे चवदार, पौष्टिक आणि हलके आहे, ज्यामुळे दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा ठासून राहील
हेही वाचा :
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील