काँग्रेस उमेदवारासाठी पैशांचं वाटप, 5 जणांना अटक

बेळगाव : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी(warehouse distribution) सुरू असून तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जागोजागी चेकपोस्ट असल्याचं दिसून येतं. निवडणूक काळात होणाऱ्या गुन्हेगारी व अवैध घटनांना आळा घालण्याच काम होत आहे.

मात्र, तरीही कुठे ना कुठे पोलिसांच्या छाप्यात रोकड, मद्यसाठा जप्त(warehouse distribution) केला जात आहे. त्यातच, तिसऱ्या टप्प्यातील मतदान केवळ एक दिवसांवर येऊन ठेपल्याने पैसेवाटपाच्याही घटना समोर येत आहेत. बेळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचे कार्यकर्ते गोकाक येथे घरोघरी पैसे वाटत असताना आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्याने आता रात्रीस खेळ चाले, अशा माध्यमातून मतदारांना अमिष दाखवण्यात येत आहे. त्यातच, बेळगावचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर ह्यांच्या कार्यकर्त्यांना भाजप समर्थकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होतं. पोलिसांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये जप्त केले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या 5 जणांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. लोकसभा मतदारसंघातील मतदारांना वाटण्यासाठी कार्यकर्त्याच्या एका घरात लाखो रुपये ठेवले होते. या पैसेवाटप मोहिमेची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहात पकडले.घरोघरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटणाऱ्या पाच जणांना पैशांसह रंगेहात पकडण्यात आले.

विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मतदारांना वाटण्यासाठी आणलेली 20 लाख रुपयांची रक्कम भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. एका कारमध्ये काँग्रेस उमेदवाराची पत्रके आणि पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, भाजपने बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील लिंगायत समाजाचे प्राबल्य पाहून काँग्रेसने महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल रवींद्र हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत प्रथमच भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी येथील खोतवाडी तारदाळ रोडवर अपघात; दोघे गंभीर जखमी

धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये……

शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?