इचलकरंजी येथील खोतवाडी तारदाळ रोडवर अपघात; दोघे गंभीर जखमी

खोतवाडी तारदाळ रोडवर झालेल्या अपघातात(accident) दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. खोतवाडी तारदाळ रोडवर जावाईवाडी परिसरातील विजय पोवार यांच्या दुकाना समोर बसलेल्या बापू सुर्यवंशी (वय ६५ ) व अंजना पोवार यांना भरधाव युनोव्हा ( एम एच ०९ सी एल ११२२ ) चार चाकी गाडीने उडविल्याने सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर अजंना पोवार यांचा उजवा पाय निकामी झाला आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलीसांत झाली आहे.

सायंकाळच्या वेळेस दुकानासमोर(accident) असलेल्या कट्यावरती बापू सुर्यवंशी व अंजना पोवार हे बसले होते. दरम्यान सहाच्या सुमारास खोतवाडी कडून भरधाव वेगाने येणाऱ्या युनोव्हा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तटबंदी उडवत बसलेल्या या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गाडीखाली सापडले. यावेळी भागातील नागरीकांनी प्रयत्नांची शिकस्त करत गाडीखाली सापडलेल्या जखमीना बाहेर काढले.

एब्युलन्सला पाचारण करून जखमीना उपचारासाठी सांगली सिव्हील येथे दाखल केले. सदर गाडी कलढोणे नामक मालकाची असून गाडी चालवणारा युवक जमाव जमताच अपघात स्थळावरून पसार झाला. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून गाडी ताब्यात घेतली आहे. दरम्यान परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती.

हेही वाचा :

इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा

इचलकरंजीत काही काळ तणाव! स्वाभिमानी – ठाकरे आमनेसामने

मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी