इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठे शहर असलेल्या इचलकरंजीकडे(candidate search) सर्वच उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जास्तीत जास्त मते घेण्यासाठी सुरुवातीपासूनच यंत्रणा कार्यान्वित होती. राष्ट्रीय नेत्यांबरोबरच राज्य पातळीवरील नेत्यांनीदेखील इचलकरंजीत प्रचाराचे रान उठवले होते. येत्या मंगळवार ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची सांगता रविवारी (५ मे) रोजी सायंकाळी ६ वाजता होत आहे.

प्रचार सांगताच्या निमित्ताने तिन्ही प्रमुख उमेदवारांनी(candidate search) इचलकरंजी शहरात शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक प्रमुख नेते रविवारी इचलकरंजीत असल्याने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

आता रविवारी प्रचार समाप्तीच्या निमित्ताने धैर्यशील माने, सत्यजित पाटील- सरुडकर आणि राजू शेट्टी या तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदयात्रेने होणार आहे. या पदयात्रेत दहा हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने व डॉ. राहुल आवाडे यांनी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत दिली.

हेही वाचा :

सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित… विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

‘राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते’; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

‘बावड्याचा पोरगा कोणासमोर झुकणार नाही’; सतेज पाटलांचा कोणाला उद्देशून इशारा?