पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर स्पष्टपणे(minister) भाष्य केलं आहे. समान नागरी कायदा लागू व्हावा ही संविधानाची भावना आहे. संविधानातच तसं लिहिलं आहे. पण अजूनही हा कायदा लागू करण्यात आला नाही. त्यामुळे ज्यांनी हा कायदा लागू केला नाही. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. देश चालवायचा आहे तर देशात समान नागरी कायदा असावा की नसावा? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
संपादकांशी मनमोकळा संवाद साधताना पंतप्रधानांनी(minister)देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांना समान नागरी कायद्याबाबतचा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत समान नागरी कायदा का हवा? याचं विवेचन केलं. समान नागरी कायदा लागू कधी करणार? हा सवाल मीडिया आम्हाला विचारत आहे. मला आश्चर्य वाटतं. मीडियाने हा सवाल 75 वर्षानंतर का विचारला? त्या आधी का विचारला नाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक सरकारला आणि पंतप्रधानांना हा सवाल विचारायला हवा होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने 2500 वेळा गाजावाजा करून सांगितलं की सरकारने यूसीसीवर (समान नागरी कायदा) पावलं उचलली पाहिजे. म्हणून तुम्ही काँग्रेसकडेच याबाबतचं उत्तर मागितलं पाहिजे. यूसीसीविरोधात आवाज उठवणाऱ्यांना मी सांगतो, जरा गोव्याकडे पाहा. देश स्वातंत्र झाला तेव्हापासून तिथे यूसीसी आहे. गोव्यात सर्वाधिक मायनॉरिटी आहेत. तरीही गोव्यात काहीच समस्या नाही.
सुखासमाधानाने सर्व राहत आहेत. गोवा वेगाने विकास करत आहे. त्यामुळे सर्व राज्यांना आज वाटत की, जर समान नागरी कायद्यामुळे गोव्यात सुख समाधान आहेत तर आपल्या राज्यात का नाही? त्यामुळेच समान नागरी कायदा आणण्यासाटी आम्ही वचबद्ध आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करणार हे आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये सांगत आलो आहोत. आता त्यावर कशा पद्धतीने पुढे जायचं, कसा मार्ग काढायचा हे आपण परिस्थितीनुसार करत असतो. जसं देशाच्या एकतेसाठी संविधान जिथं नव्हतं तिथं आपण पोहोचवलं, तशीच आमची कमिटमेंट आहे. ही कमिटमेंट आमची पॉलिटिकल आयडॉलॉजी नाही. तर संविधानातील भावनेचाच भाग आहे.
संविधानातील भावना यूसीसीबद्दल बोलत आहे. देशातील सुप्रीम कोर्ट यूसीसीबद्दल बोलत आहे. देशातील संवैधानिक संस्थांनी जे सांगितलं, ते करण्याचे आम्ही मार्ग शोधत आहोत. त्यामुळे आम्ही जनतेचे आशीर्वाद मागत आहोत, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा :
प्रचाराच्या धुरळ्यात विकास आणि महागाईचे मुद्दे गायब
IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण
मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, ‘हा’ मोठा नेता सोडणार पक्ष