प्रशांत कोरटकर कोल्हापुरात येताच घडलं भयंकर? शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी तेलंगणा येथे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळीच त्याला कोल्हापूरात(Kolhapur) आणण्यात आले आहे. अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देऊन आपला ठाव ठिकाणा बदलत होता. त्यामुळे पोलिसांना शोध घेणे अवघड झाले होते. पण, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तेलंगणातून त्याला अटक केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता.

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur)जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते.

प्रशांत कोरटकर याला आता कोल्हापुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळी राजवाडा पोलीस स्टेशनला आणताना देखील आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. आता थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर आजच प्रशांत कोरटकरला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्याला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुना राजवाडा पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र, अटकेच्या भीतीने तो विविध ठिकाणी पळ काढत होता. त्यामुळे त्याचा निश्चित हा ठिकाणा लागत नव्हता. कोल्हापूर पोलीस त्याच्या पाळतीवर होते. तसेच नागपुरातही ठाण मांडून बसले होते. मागील दोन दिवसात तो दुबईला पळून गेला आहे, अशी अफवा होती . त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला पासपोर्ट जमा करावा अशी नोटीस दिली होती. त्याच्या पत्नीने तत्काळ सदरचा हा पासपोर्ट पोलिसांच्याकडे जमा केला होता.

हेही वाचा :

अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला मुहूर्त कधी?

हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला

दररोज फक्त ₹७ गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा