‘सगळे उभे राहिले आणि अचानक..’ भुशी डॅमच्या आत गेलेल्या अन्सारी कुटुंबाचे काय झाले?

मावळ : लोणावळ्यातील भुशी डॅम इथं वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण पाण्यात(dam) वाहून गेल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची गंभीर दखल प्रशासनानं घेतली असून संध्याकाळी सहानंतर राज्यातीलल सर्वच पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी असणार आहे.

या पार्श्वभूमीवर(dam) पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला असून लवकरच लोणावळ्यातील पर्यटनासाठी गाईडलाईन्स जाहीर होणार आहेत.लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यामुळं आता संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटाला धक्का 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका

गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन… आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर