“राजर्षी शाहू महाराजांना साजेसं कोणतं काम छत्रपती घराण्यानं केलं?” मंडलिकांच्या पुत्राचा हल्लाबोल

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये(maharaj near me) आरोप-प्रत्यारोपांची जोरदार बॅटिंग सुरू आहे. छत्रपती घराण्यानं प्रचारात आघाडी घेतली असताना मंडलिक कुटुंबीय देखील मागे राहिलं नाही. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक हे सुद्धा रिंगणात उतरले आहेत. यातच शुक्रवारी ( 20 एप्रिल ) कागल विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारार्थ मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर तोफ डागली. तसेच, शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते, समरजितसिंह घाटगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

“राजर्षी शाहू महाराज(maharaj near me) यांच्या नावानं एकही उद्योग छत्रपती घराणं काढू शकलेलं नाही. 12 ते 15 वर्षापासून बंद पडलेली शाहू मिल सुद्धा त्यांना सुरू करता आलेली नाही. पण, छत्रपती घराण्याला साजेस असं काम विक्रमसिंह घाटगे आणि समजितसिंह घाटगे यांनी केलं,” असं वीरेंद्र मंडलिकांनी म्हटलं. वीरेंद्र मंडलिकांनी थेट छत्रपती घराण्यावर टीका केल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, “छत्रपती कुटुंबानं राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. ते काम जनक घराणे म्हणून स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांनी केलं.”

“राजर्षी शाहू महाराज हे आमचे दैवत आहेत. पण, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं एकही उद्योग छत्रपती घराण्यानं सुरू केला नाही. 12 ते 15 वर्ष बंद पडलेली शाहू मिल देखील छत्रपती घराण्याला सुरू करता आलेली नाही. राजर्षी शाहू महाराज यांचे खरे जनक वारसदार समरजितसिंह घाटगे आहेत,” असं मंडलिकांनी म्हटलं.

“स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी देखील राजर्षी शाहू महाराज यांची मूल्य जपली आहेत. त्यांनी शाहू कारखाना सुरू केला. पण, छत्रपती घराण्यानं एक उद्योग शाहू महाराज यांच्या नावानं सुरु केलेला दाखवावा. शाहू कारखान्याचा आदर्श आम्हीही घेतो,” असं म्हणत वीरेंद्र मंडलिकांनी छत्रपती घराण्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा :

पहाट शपथविधीचे भूत हळूहळू उतरते आहे….

महाराष्ट्रात खळबळ! टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग

पहाटेच्या शपथविधीबाबतचा अजितदादांचा दावा पवारांनी फेटाळला; भाजपसोबत जाण्याची इच्छा…