सचिनच्या एका प्रश्नावर सर डॉन ब्रॅडमन यांनी गमतीशीर (funny)उत्तर दिलेलं, जाणून घ्या त्या संभाषणाबद्दल.
क्रिकेटमधील महान फलंदाजांबद्दल जेव्हाही चर्चा केली जाते, त्यात हमखास दोन नावं येतात; ती दोन नावं (funny)म्हणजे एक ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॉन ब्रॅडमन आणि भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर.
खरंतर दोघंही अगदी वेगवेगळ्या काळात क्रिकेट खेळले. पण दोघांनीही आपापल्या काळात फलंदाजीची नवी उंची गाठली. दरम्यान, या दोन दिग्गजांची एकदा अविस्मरणीय अशी भेट झाली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबद्दलही सचिन तेंडुलकरने एबीसी ऑस्ट्रेलियाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितले आहे.
सचिनसाठी 1998 वर्ष शानदार राहिलं होतं. तो क्रिकेट मैदानं तर गाजवत होताच, पण त्याला त्यावर्षी ब्रॅडमन यांच्या 90व्या वाढदिवसाचं आमंत्रण होतं. त्याच्याबरोबर त्यांच्या घरी जाणार होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि सचिनचा मित्र शेन वॉर्न.
सचिन-वॉर्नचं ‘तू की मी’
सचिनने या भेटीबद्दल सांगितलं, ‘मी तेव्हा चेन्नईमध्ये कॅम्पमध्ये होतो आणि माझ्या मॅनेजरने मला सांगितले की सर डॉन यांचा 90 वा वाढदिवस आहे, त्यांनी मला ऑस्ट्रेलियाला बोलायवलंय आणि शक्य झाल्यास त्यांच्या घरी भेटायला सांगितलंय.’
‘2 होल्डन स्ट्रिटवर असलेल्या सर डॉन यांच्या घरी जातानाचा अनुभव अविस्मरणीय होता. यातही गमतीची गोष्ट अशी की मी वॉर्नबरोबर त्यांच्या घरी जात होतो आणि वॉर्न मला म्हणाला की संभाषण तू चालू कर, त्यावर मी त्याला म्हणाला, तू ऑस्ट्रेलियाचा आहेस, तू इथला स्थानिक आहेस, तर तूच संभाषण चालू केलं पाहिजेस, मी नाही.’
‘वॉर्नने त्यावर मला सांगितलं, मी त्यांच्याबरोबर काय बोलू? तूम्ही दोघं फलंदाज आहात, तुम्ही फलंदाजीबद्दल बोलू शकतात.’
सचिनने पुढे सांगितलं की सर ब्रॅडमन खूप हुशार होते आणि त्यांना क्रिकेटमध्ये काय चालूये हे माहित होतं.
ब्रॅडमन यांचं मजेशीर उत्तर
सचिनने पुढे सांगितलं की ‘त्यावेळी आम्ही सहाजिकच सर डॉन यांना एक प्रश्न विचारला, सध्याच्या क्रिकेटमध्ये (1990 च्या दशकात) तुमची सरासरी काय असती?’
त्यावर ब्रॅडमन यांनी सांगितलं की, ‘कदाचीत 70 च्या जवळपास.’ हे उत्तर ऐकून सचिनला मात्र आर्श्चर्य वाटलं. कारण ब्रॅडमन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरासरीही 99.96 आहे. पण नंतर ब्रॅडमन यांनी त्यांच्या उत्तरामागील गमतीशीर कारणही सचिनला सांगितलं. ब्रॅडमन यांनी सांगितलं की ‘मुला, 90 वर्षाच्या व्यक्तीसाठी 70 ची सरासरी काही वाईट नाही ना.’
हेही वाचा :
शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त
सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?
मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये; सतेज पाटीलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम