…तर कोलकाता न खेळताच अंतिम फेरीत पोहोचणार

आयपीएलचा शेवटचा सामनाही पावसामुळे एकही चेंडू न टाकताच रद्द करण्यात आला आणि कोलकाता-राजस्थान या दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण विभागून देण्यात आला. त्यामुळे आता क्वालिफायर सामना कोलकाता-हैदराबाद या अव्वल दोन संघांत होईल आणि एलिमिनेटरमध्ये राजस्थान आणि बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यात झुंज रंगेल. पण पावसाच्या व्यत्ययामुळे या दोन्ही लढती होऊ न शकल्यास क्वालिफायरमधून कोलकाता थेट अंतिम फेरीत पोहोचेल तर एलिमिनेटरमधून राजस्थान क्वालिफायर-2 साठी पात्र ठरेल.

या लढतींसाठी राखीव दिवस नसल्यामुळे उभय संघात जो साखळीत सरस असेल त्यालाच विजयी घोषित केले जाणार आहे. मात्र 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादमध्ये होणाऱया दोन्ही सामन्यांवर पावसाचे संकट नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावण्याची शक्यता कमीच आहे.(royal challengers bangalore)

गुणतालिकेतील स्थान निश्चित करण्यासाठी अखेरच्या साखळी लढतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. राजस्थानला सामना जिंकून दुसऱया स्थानावर झेप घेण्याची संधी होती. राजस्थानच्या विजयानंतर हैदराबाद आपोआप तिसऱया स्थानावर पोहोचला असता, मात्र कोलकाता विजयी ठरला असता तर हैदराबादचे दुसरे स्थान कायम असते. पण सामनाच वाहून गेल्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक-एक गुण विभागून देण्यात आला. आता पुढील दोन्ही सामने अहमदाबादमध्ये खेळविले जाणार आहेत.

अहमदाबादचा गेला सामनाही पावसामुळे वाहून गेला होता. जर अशी परिस्थिती पुढील सामन्यातही ओढावली तर कोलकाता-हैदराबाद लढतीत कोलकाता गुणतालिकेत अव्वल असल्यामुळे थेट अंतिम सामन्यात पोहोचेल आणि एलिमिनेटरमध्येही हेच संकट ओढावले तर बंगळुरूला न खेळताच बाद व्हावे लागेल. मात्र क्वालिफायर-2 मध्येही पावसाने व्यत्यय आणला आणि 5-5 षटकांचा सामना होऊ शकला नाही तर हा सामना राखीव दिवशी खेळविला जाईल. अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. राखीव दिवशीही खेळ न झाल्यास अंतिम जेतेपद दोन्ही संघांना विभागून दिले जाईल.

हेही वाचा :

तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

‘धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने…,’ दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा